Wednesday, July 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

“वालचंद कनिष्ठ महाविद्यालय अकरावी  प्रवेशोत्सव जल्लोषात संपन्न “

तरुण भारतbyतरुण भारत
July 1, 2026
in solapur
0
“वालचंद कनिष्ठ महाविद्यालय अकरावी  प्रवेशोत्सव जल्लोषात संपन्न “
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर – वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स कनिष्ठ महाविद्यालयातील  इयत्ता 11वी’ विज्ञान’ व ‘कला’ शाखेतील विद्यार्थ्यांच्या   नवीन शैक्षणिक वर्ष 2026- 27 चा महाविद्यालयीन प्रवेशोत्सव  आज बुधवार दिनांक 1 जुलै रोजी, सकाळी 11 वाजता, महाविद्यालयाच्या प्रांगणात मान्यवरांच्या, प्रवेशित विद्यार्थी पालक, शिक्षक यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला. याप्रसंगी, प्राचार्य डॉ. संतोष कोटी, मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या शिक्षणाधिकारी योजना विभाग सौ सुलभा वठारे मॅडम, जेलरोड पोलीस स्टेशनच्या एपीआय सौ. ज्योत्स्ना  भांबिस्टे मॅडम, सय्यद मॅडम, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. मनोहर जोशी,डॉ. राजशेखर हिप्परगी, बायोटेक विभागाचे डॉ. राव,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनुप म्हेत्रे,पर्यवेक्षक डॉ. जीवराज कस्तुरे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत  उपप्राचार्य अनुप म्हेत्रे यांनी केले. त्यांनी अकरावीला प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांचे महाविद्यालयाच्या वतीने  हार्दिक स्वागत करून, महाविद्यालयात संपन्न होणाऱ्या, इयत्ता बारावीचा निकाल, मंथली टेस्ट, महाविद्यालयीन शिस्त, व विद्यार्थ्यांची सुरक्षा, गुणवत्ताधारक शिक्षक, वर्षभर संपन्न होणार्‍या विविध स्पर्धा, उपक्रमांची माहिती देऊन त्याचा लाभ घेण्याचे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
 मुख्य अतिथी म्हणून लाभलेल्या शिक्षणाधिकारी सौ. सुलभा वठारे यांनी, वालचंद महाविद्यालयाच्या गुणवत्तेचे,शिस्तीचे, कार्यालयीन विभागाकडून मिळणाऱ्या सहकार्याचे, प्राचार्य व उपप्राचार्यांचे अभिनंदन करून, ” दिवस तुझे हे फुलायचे “- या भावपूर्ण गीतांच्या ओळींचा दाखला देऊन, महाविद्यालयात अकरावी प्रवेशित विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्त्वाच्या विविध विविध अंगाने फुलायचे, वयाच्या बेभानपणाला नियंत्रित करून, भान ठेवून, उज्वल भविष्याकडे वाटचाल करा, असे आवाहन त्यांनी केले. एपीआय ज्योत्स्ना भांबिस्टे यांनी, प्रवेशित विद्यार्थ्यांना शुभेच्छा व सदिच्छा देऊन,  हिऱ्याला पैलू पाडताना हिऱ्याला त्रास सहन करावा लागतो, तसे पुढील दोन वर्षे जर तुम्ही,सातत्यपूर्ण अभ्यास केला, तर तुम्ही देखील तुमची स्वप्ने पूर्ण करू शकाल. काही जीवनात अडचणी आल्या तर महाविद्यालय आणि मी देखील तुमच्या पाठीशी आहे. भविष्यकाळात समुपदेशक म्हणून मी, तुम्हाला निश्चित मार्गदर्शन करण्यासाठी येईन, असे आश्वासन  उपस्थित विद्यार्थ्यांना दिल. उपप्राचार्य डॉ. मनोहर जोशी यांनी, वालचंद महाविद्यालयातील माजी विद्यार्थी, देशात व परदेशात उच्च पदावर कार्यरत असून, त्यांनी आपल्या महाविद्यालयाचे नाव उज्वल केले आहे. कृषी दिनाच्या शुभेच्छा देऊन, इथे असणाऱ्या गुणवत्ताधारक शिक्षकांकडून मिळणाऱ्या उत्तम संस्काराचे बीज घेऊन आपल्या जीवनाची यशस्वी वाटचाल करा अशा सदिच्छा व शुभेच्छा त्यांनी याप्रसंगी दिल्या.
 याप्रसंगी, अकरावी प्रवेशित झालेल्या ‘कला’ व ‘विज्ञान’ शाखेतील गुणानुक्रमे  प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा   उपस्थित  मान्यवरांच्या  शुभहस्ते गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, विद्यार्थिनींना महाराष्ट्र शासनाच्या, ” पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर मोफत एसटी पास योजना” उपक्रमांतर्गत 28 विद्यार्थिनींना, मोफत पास वाटप उपस्थित मान्यवर व योजना समन्वयक शैलेंद्र विठ्ठलदास यांच्या हस्ते करण्यात आले.  याप्रसंगी, उपस्थित मान्यवरांनी,  अभिनव अशा सेल्फी पॉईंटचे _ “आय लव वालचंद एज्युकेशन ग्रुप “याचे फीत कापून तसेच, स्वतः सेल्फी काढून उद्घाटन केले.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन तुपकर व प्रशांत पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख राहुल हजारे, तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील  शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनीचे सहकार्य लाभले.
Post Views: 36
Previous Post

डॉ. देशपांडे संघाचा हबीब संघावर  दिमाखदार विजय

Next Post

वालचंद’चे वरिष्ठ लिपिक भगवान खुरगांवकर यांचा सन्मान 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

वालचंद'चे वरिष्ठ लिपिक भगवान खुरगांवकर यांचा सन्मान 

ताज्या बातम्या

मनपा मुलांची केंद्र शाळा 9 मध्ये शालेय साहित्याचे वाटप

मनपा मुलांची केंद्र शाळा 9 मध्ये शालेय साहित्याचे वाटप

July 1, 2026
सोलापूर महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

सोलापूर महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

July 1, 2026
सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

July 1, 2026

वालचंद’चे वरिष्ठ लिपिक भगवान खुरगांवकर यांचा सन्मान 

July 1, 2026
“वालचंद कनिष्ठ महाविद्यालय अकरावी  प्रवेशोत्सव जल्लोषात संपन्न “

“वालचंद कनिष्ठ महाविद्यालय अकरावी  प्रवेशोत्सव जल्लोषात संपन्न “

July 1, 2026
डॉ. देशपांडे संघाचा हबीब संघावर  दिमाखदार विजय

डॉ. देशपांडे संघाचा हबीब संघावर  दिमाखदार विजय

July 1, 2026
पद्मशाली शिक्षण संस्था येथे विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

पद्मशाली शिक्षण संस्था येथे विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

July 1, 2026

महापालिका भंगार चोरी प्रकरणात मोठी कारवाई

July 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0952113

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697