Sunday, July 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूरच्या श्रेयाची अवकाशयात्री म्हणून दमदार कामगिरी

तरुण भारतbyतरुण भारत
July 5, 2026
in solapur
0
सोलापूरच्या श्रेयाची अवकाशयात्री म्हणून दमदार कामगिरी
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : आकाशाला गवसणी घालण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांसाठी कोणतीही सीमा अशक्य नसते, याची प्रचिती सोलापूरच्या श्रेया जयकुमार माने हिने आपल्या कर्तृत्वातून दिली आहे. गुजरातमधील धोलावीरा येथे आका स्पेस संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेले लुनार अनलॉग मिशन यशस्वीपणे पूर्ण करून श्रेयाने नवोदित अवकाशयात्री म्हणून आपल्या कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, संपूर्ण जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.

चंद्रावरील वास्तव्यासारख्या वातावरणाची पृथ्वीवर निर्मिती करून भविष्यातील मानवी चंद्र मोहिमांसाठी आवश्यक प्रशिक्षण देणाऱ्या या अत्याधुनिक मोहिमेत श्रेयाने क्र्यु सायकॉलॉजिस्ट ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. मोहिमेदरम्यान तिने सहकारी सदस्यांच्या मानसिक आरोग्याचे मूल्यमापन, तणाव व्यवस्थापन, संघभावना वृद्धिंगत करणे, नेतृत्व विकास आणि संकटसमयी योग्य निर्णय घेण्यासाठी आवश्यक मानसशास्त्रीय मार्गदर्शन केले.

ही मोहीम पृथ्वीवरील प्रतिकूल, एकाकी आणि मर्यादित संसाधनांच्या परिस्थितीत चंद्रावरील वास्तव्यासारखा अनुभव देण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेत सहभागी सदस्यांनी EVA (Extravehicular Activity) Simulation, हॅबिटॅट ऑपरेशन्स, वैज्ञानिक संशोधन, मिशन नियोजन, संसाधन व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या प्रशिक्षणामुळे सहभागींच्या तांत्रिक, वैज्ञानिक, नेतृत्व, निर्णयक्षमता आणि संघभावना या गुणांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी त्यांना अधिक सक्षम बनविण्यात ही मोहीम महत्त्वाची ठरली.

या मोहिमेचे नेतृत्व मिशन कमांडर  कीर्ती विप्पर्थी यांनी केले. गीतांजली राजपूत यांनी एव्हिए लीड , श्रेया जयकुमार माने यांनी क्र्यू सायकॉलॉजिस्ट, तर प्रियांदर्शिनी अय्यनार हिने मेडिकल ऑफिसर म्हणून जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली.

श्रेया जयकुमार माने ही माजी आ. ब्रह्मदेव माने यांची नात तर सोलापूर मनपाचे नगरसेवक जयकुमार माने व प्रिया जयकुमार माने यांची कन्या असून, माजी आमदार दिलीप माने यांची पुतणी आहे. अवकाश संशोधनासारख्या अत्यंत आव्हानात्मक क्षेत्रात तिने मिळविलेल्या या यशामुळे तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. सोलापूरकरांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिची ही कामगिरी राज्यातील तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधन क्षेत्रात मोठी स्वप्ने पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्रेयाने एक नवा आदर्श निर्माण केला असून, भविष्यात भारताच्या अंतराळ मोहिमांमध्ये तिचे योगदान निश्चितच मोलाचे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Post Views: 19
Previous Post

वारीसाठी ग्रामपंचायती सज्ज; ८१ गावांना ३.७१ कोटींचा निधी वितरित

Next Post

सरकारी शाळेतच खाजगी शाळेचे ‘बस्तान ; शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सरकारी शाळेतच खाजगी शाळेचे 'बस्तान ; शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली 

ताज्या बातम्या

सायकलच्या धक्क्यावरून वाद; उजनीत मध्यस्थी करणाऱ्या चुलत्याचा दगड मारून खून

July 5, 2026
खुनेश्‍वर मध्ये शेती विषयी मोबाईल अ‍ॅप्सच्या प्रात्यक्षिकासाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी बनल्या कृषीकन्या

खुनेश्‍वर मध्ये शेती विषयी मोबाईल अ‍ॅप्सच्या प्रात्यक्षिकासाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी बनल्या कृषीकन्या

July 5, 2026
विमल कन्या प्रशाला, श्री शिवाजी मराठी विद्यालयात कृतज्ञता सोहळा  

विमल कन्या प्रशाला, श्री शिवाजी मराठी विद्यालयात कृतज्ञता सोहळा  

July 5, 2026

सहाशे किमी सायकलिंग केवळ ३३.४७ तासात पूर्ण : आयर्नमॅन कैलास झोळगे यांचा विक्रम

July 5, 2026

बनावट दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे शासकीय नोकरी मिळविली – अहमद नगरच्या तरुणावर सोलापुरात फसवणुकीचा गुन्हा दाखल

July 5, 2026
पोलिस आणि  जनतेमध्ये समन्वय साधून काम करणार – डीवायएसपी राजेंद्र टाकणे

पोलिस आणि  जनतेमध्ये समन्वय साधून काम करणार – डीवायएसपी राजेंद्र टाकणे

July 5, 2026

ध्यान केल्याने मन प्रसन्न राहते.. ओंकारेश्वर उटगे

July 5, 2026
मोहोळ सोलापूर पासून तोडू नका : उपमुख्यमंत्री  पवार यांच्याकडे यांची मागणी 

मोहोळ सोलापूर पासून तोडू नका : उपमुख्यमंत्री  पवार यांच्याकडे यांची मागणी 

July 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0960054

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!