बार्शी – लायन्स क्लब बार्शी रॉयलचा या वर्षाचा पदग्रहण सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सोलापूर जिल्ह्याचे विधान परिषदेचे आमदार राजेंद्र राऊत, प्रांताचे माझी प्रांतपाल MJF ला. प्रभूद चंद्र झपके, ला. झपके मॅडम तसेच VDG1ला. डॉ. किरण खोराटे व ला. कल्याणी खोराटे, माजी प्रांतपाल व रॉयल क्लबचे मार्गदर्शक ला. जितेंद्र दोशी, pmjf ला. महेश नळे रिजन चेअरमन ऍड. ला. अमिता कारंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
आमदार राजेंद्र राऊत यांनी नूतन अध्यक्ष ला. मंगेश बागुल यांना शुभेच्छा देताना बागुल कृषी क्षेत्रातील तज्ञ असून आमदार साहेबांच्या शेतालाही त्यांचे मार्गदर्शन काही काळापूर्वी लाभलेले आहे. या पुढील काळात सुद्धा समाजोपयोगी कार्यक्रम करत असताना वृक्ष लागवडीवर भर द्यावा ही विनंती केली. तसेच लायन्स क्लबला कुठलीही मदत लागली तर ती मदत करण्याचे आश्वासन पण दिले.
शपथ ग्रहण अधिकारी ला. झपके सर यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना शपथ दिली व लायन्स क्लबचे कार्याच्या बाबतीत माहिती देऊन पुढील कार्यासाठी अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या
नवीन सदस्यांना शपथविधीसाठी उपस्थित असलेले VDG1 ला.डॉक्टर किरण खोराटे यांनी नवीन सदस्यांना शपथ देऊन लायन्स क्लबच्या कार्याची माहिती दिली व सदस्यांची जबाबदारीची जाणीव करुन दिली.
नूतन अध्यक्ष ला.मंगेश बागुल यांनी येणाऱ्या वर्षात समाजोपयोगी कार्य करणार असल्याचे सांगितले.
मंगेश बागुल हे कृषी क्षेत्रात असल्या कारणाने या वर्षात शेतकऱ्यांसाठीच चांगले उपक्रम राबवण्याचे आश्वासन दिले. तसेच या पदग्रहणाच्या कार्यक्रमातच शेतकरी दिन, डॉक्टर दिन व सी.ए, दिनानिमित्त डॉक्टर, शेतकरी व सी.ए. चा सन्मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले
ला. जितेंद्र दोशी, ला. महेश नळे, ला.अमिता कारंडे, ला.राहुल दोशी यांनी क्लबच्या सर्व सदस्यांना व अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी व ग्रोटेक परिवारातील सर्व सेल्स ऑफिसर व तिरुपती परिवारातील सर्व सदस्य पत्रकार बंधू व मित्र परिवार उपस्थित होते. सूत्रसंचालन ला. गणेश भंडारी व ला. शितल भंडारी यांनी तर आभार सेक्रेटरी दयानंद रेवडकर यांनी मानले.
Post Views: 11