सोलापूर – चेन्नई येथे ७ ते १० जुलै दरम्यान पार पडलेल्या ७९ व्या वरिष्ठ राष्ट्रीय ॲक्वाटिक चॅम्पियनशिप २०२६ मध्ये सोलापूरच्या ज.रा. चंडक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी संकेत श्रीशैल लिगाडे (१२ वी सायन्स) याने ‘हायबोर्ड डायव्हिंग’ प्रकारात कांस्य (ब्राँझ) पदक पटकावले. या स्पर्धेत देशभरातील विविध राज्ये आणि सैन्य दलाच्या संघांनी सहभाग घेतला होता. संकेतला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्रीकांत शेटे व क्रीडा शिक्षक दशरथ गुरव यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सचिन भैय्या ठोकळ, सचिव शिल्पाताई ठोकळ व संचालक प्राचार्य दत्तात्रेय गाजरे यांच्या हस्ते संकेतचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य मोहनराव घोडके आणि प्राध्यापिका नफिसा शेख उपस्थित होत्या.
——
























