मोहोळ – मुख्यमंत्री बळीराजा शेत -पाणंद रस्ते योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी स्थानिकांचा अधिक सहभाग असावा म्हणून निर्माण केलेल्या विधानसभा समितीच्या सह अध्यक्षपदी भाजपाचे युवानेते अजिंक्यराणा राजन पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
राज्यातील शेतकरी व ग्रामीण भागाला दर्जेदार शेत व पाणंद रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.
या समितीमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाने मोहोळ तालुका समितीच्या सहअध्यक्षपदी मोहोळचे युवा नेते अजिंक्यराणा राजन पाटील यांची नियुक्ती केली आहे.
त्यांच्या नेतृत्वातून मोहोळ तालुक्यातील शेतकरी बांधवांना अधिक सक्षम व दर्जेदार पायाभूत सुविधा मिळतील आणि मुख्यमंत्री बळीराजा शेत -पाणंद रस्ते योजना अधिक प्रभावीपणे राबविली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे
Post Views: 11