सांगोला – शेतकरी कामगार पक्षाचे राज्याचे सरचिटणिस माजी आ.जयंत पाटील यांच्या आदेशानुसार व आ.डाॅ.बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या सोशल मिडीया प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी शेकापच्या राज्य सोशल मिडीया कोअर कमेटीवर सांगोला तालुका प्रसिध्दी प्रमुख चंद्रकांत सरतापे, प्रा.एन.डी बंडगर यांची निवड केली. सदर निवडीचे पत्र सम्या कोरडे यांनी दिले.
स्व.आ.गणपतरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत सरतापे यांनी अनेक वर्ष काम केले आहे. या निवडीबद्दल
आ.डाॅ.बाबासाहेब देशमुख, डॉ.निकिता देशमुख, दादाशेठ बाबर, दिपक गोडसे, विजय राऊत यांनी चंद्रकांत सरतापे व प्रा.एन.डी बंडगर यांचे अभिनंदन केले.