बार्शी – मागील महिनाभर दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी (ता. १६) सायंकाळी बार्शी शहरासह तालुक्यातील जामगाव (आ), भांतबरे, झरेगाव, वैराग, शेलगाव (मा), देवगाव, गाडेगाव, कांदलगाव, नागोबाचीवाडी, घाणेगाव, लक्ष्याची वाडी, मालेगाव, तावडी, सौंदरे, बावी, गोरमाळे, हत्तीज, सारोळे, सर्जापूर, गौडगाव, कव्हे, कोरफळे, राळेरास, काळेगाव, उक्कडगाव, खडकोणी, मळेगाव, शिराळे, पिंपळगाव, लाडोळे, घारी, पांगरी, साकत, अलीपूर, पांढरी, बोरगाव, मानेगाव, शेळगाव (आर) आदी गावांत जोरदार पावसाने हजेरी लावली.
सायंकाळी सव्वासातच्या सुमारास सुरु झालेला मुसळधार पाऊस साडेआठ वाजल्यानंतरही सुरुच होता. दोन दिवसांच्या प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या बार्शीकरांना या पावसाने मोठा दिलासा दिला. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या पावसामुळे बळीराजासह सर्वसामान्य नागरिक सुखावले आहेत.रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरु होती.
यंदाच्या पावसाळी हंगामास दीड महिना उलटूनही शहर व तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नव्हता. त्यामुळे तालुक्यात पेरणी झालेली नव्हती. गुरुवारी झालेल्या पावसामुळे पेरणीच्या आशा पुन्हा पल्लवघत झाल्या आहेत.
Post Views: 7