सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर कौन्सिल हॉल येथील महापौर कार्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृहनेते नरेंद्र काळे, शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, महेश देवकर,सुरेश पाटोळे,कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजितकुमार खानसोळे, चंद्रकांत दोंतूल , जयप्रकाश आमनगी आदी मान्यवर उपस्थित होते.