सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आणि जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायजेशन, सोलापूर यांच्यात दि. ०३ सप्टेंबर रोजी सामंजस्य करार करण्यात आला. जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जीतो) ही जैन समाजातील उद्योजक, व्यावसायिक, उद्योगपती आणि तरुणांना एकत्र आणणारी जागतिक स्तरावरील सामाजिक-व्यावसायिक संस्था आहे. व्यापार व उद्योगाच्या माध्यमातून ज्ञानाची देवाणघेवाण, परस्पर संबंध, उद्योजकता विकास आणि सामाजिक योगदान यांना प्रोत्साहन देणे हे जीतोचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. उद्यम फाउंडेशन, सोलापूर ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची उद्योजकता आणि स्टार्टअप विकासाला प्रोत्साहन देणारी संस्था आहे. संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थी, संशोधक आणि नवउद्योजकांना त्यांच्या कल्पनांचे व्यवहार्य उत्पादन, सेवा किंवा उद्योगामध्ये रूपांतर करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. मा. कुलगुरू कर्नल प्रा.डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यम आणि जीतो हे एकत्रितपणे विशेषतः युवा पिढीमध्ये उद्योजकतेची भावना विकसित करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम, मार्गदर्शन, संवाद व विविध उपक्रम आयोजित करणार आहेत. गुजराती भवन येथे झालेल्या जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायजेशन, सोलापूर शाखेच्या उदघाटन कार्यक्रमात ह्या सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्या. या वेळी विद्यापीठातर्फे नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्यचे संचालक प्रा. डॉ. गणेश काकांडीकर, उद्यमचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश गुराणी तर जीतो तर्फे श्री. विजय भंडारी – अध्यक्ष, जीतो अपेक्स, श्री. राजेंद्र जैन – अध्यक्ष, आरओएम झोन, श्री. राजेंद्रकुमार सांकला – संचालक, जीतो अपेक्स, श्री. अजय मेहता – उपाध्यक्ष, जीतो पुणे आणि सोलापूर जीतोचे श्री. अमित जैन उपस्थित होते. ह्या उपक्रमासाठी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा आणि प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांचे मार्गदर्शन लाभले.
——
Post Views: 30