बुधवार – दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल येथे हर्निया व हायड्रोसिल तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या तपासणी शिबिरत डॉ. ज्ञानेश्वर सोडल यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे.
शिबिरामध्ये आवश्यकतेनुसार ECG, रक्तातील साखरेची तपासणी तसेच डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी मोफत करण्यात येईल. शिबिरादरम्यान इतर तपासण्या आवश्यक असल्यास, त्या तपासण्यांवर शिबिराच्या दिवशी २५% सवलत देण्यात येणार आहे. तसेच शिबिरातून शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांना शस्त्रक्रियेच्या खर्चावर २५% सवलत देण्यात येईल.
जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMO) यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी हॉस्पिटलच्या नोंदणी कक्षाशी संपर्क साधावा.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















