Thursday, September 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आटपाडीतील अन्य अतिक्रमणांना भाजपाचा पाठींबा आहे का ?

तरुण भारतbyतरुण भारत
September 10, 2026
in west maharashtra
0
आटपाडीतील अन्य अतिक्रमणांना भाजपाचा पाठींबा आहे का ?
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
*_____________________*
आटपाडी –             आटपाडीच्या मुळ ओढा पात्रातील आणि आटपाडी शहरातील प्रचंड अतिक्रमणांना आटपाडी नगरपंचायतीतील भाजपा व त्यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांचा पाठींबा आहे का ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी उपस्थित केला आहे .
          *शुक्र ओढ्यातील अतिक्रमणे काढा .* या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांना भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिल्याच्या पार्श्वभुमीवर सादिक खाटीक यांनी हा सवाल उपस्थित केला आहे .
          आटपाडी तलावापासून आटपाडीकडे झेपावणाऱ्या दोन ओढ्यांच्या पात्रातील आणि आटपाडी शहरातल्या अनेक ठिकाणच्या शासकीय जागांवर, देवस्थान इनाम वर्ग – ३ च्या जमीनींवर केली गेलेली सिमेंट काँक्रीटची पक्की व इतर अतिक्रमणे नेस्तनाबुत करा . ही अनेक वर्षापासून करीत आलेलो मागणी दि . ८ सप्टेंबर रोजी पुन्हा सार्वजनिकरित्या सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि शासनाच्या अधिकाऱ्यांना उद्देशून आपण केल्याचे सादिक खाटीक यांनी निदर्शनास आणले .
          दि . ९ सप्टेंबर रोजी आटपाडी नगरपंचायतीच्या लेटरपॅडवरील निवेदनाद्वारे नगराध्यक्ष यु . टी . जाधव, उपनगराध्यक्षा सौ . मिनाश्रीताई मनोजकुमार पाटील, गटनेते नगरसेवक ऋषीकेश बाळासाहेब देशमुख, नगरसेवक सर्वश्री महेश आप्पासाहेब देशमुख, सौ . ललिताताई अशोक जाधव, डॉ . जयंत शिवाजीराव पाटील, सौ . राधिकाताई शशिकांत दौंडे, सौ . मनिषाताई आबासाहेब नांगरे, अजित शिवाजीराव जाधव आणि स्विकृत नगरसेवक महेश बबन डोंबे यांनी जिल्हाधिकारी महोदयांसह शासनाच्या अनेक अधिकारी महोदयांचे खास लक्ष वेधले आहे . या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे बहुमत असल्याने सर्व ठिकाणच्या अतिक्रमणां संदर्भाने रितसर ठराव घेऊन नगपंचायतीच्या मुख्याधिकांऱ्याच्या सहीने निवेदन देत शासनाकडे धाव घ्यावी असे मला सुचवावेसे वाटते .
         आटपाडी तलावाच्या सांडव्यापासून आटपाडी शहराकडे झेपावणाऱ्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहाच्या शुक्र ओढ्यातील अतिक्रमणे तातडीने काढावीत . अशी लक्षवेधी मागणी या पदाधिकाऱ्यांनी नोंदविली आहे . तथापि या ओढा पात्रातील ज्यांचे ज्यांचे अतिक्रमण असल्याचे सिद्ध झाल्यास मग ते अतिक्रमण कोणाचेही असो ते नेस्तनाबुत झालेच पाहिजे . हे आपलेही मत आहे .
          भाजपा आघाडीच्या आटपाडी नगरपंचायतील १० पदाधिकाऱ्यांनी शुक्र ओढ्यातील अतिक्रमण काढण्याच्या केलेल्या मागणीचे मी जाहीरपणे समर्थन करतो व त्या पदाधिकाऱ्यांचे खास अभिनंदनही करतो . तथापि आटपाडीच्या *मुळ ओढा पात्रावर* बांधण्यात आलेल्या आटपाडी तलावाच्या खालील चार पाचशे वर्षापासून आटपाडीकड़े झेपावणाऱ्या मुळ विस्तीर्ण ओढ्याच्या प्रचंड पात्रात आटपाडी शहरापर्यंत दुतर्फा केल्या गेलेल्या अतिक्रमणांबद्दल या भाजपा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एक शब्द ही त्यांच्या निवेदनात नोंदविला नाही , याचे सखेद आश्चर्य वाटते . त्यांच्या या एकतर्फी भूमिकेकडे मी सर्वांचे लक्ष वेधतो आहे .
          आटपाडी शहरा लगतची दीड दोनशे वर्षापासूनची ७ फुटी रुंदीची संरक्षक भिंत ओलांडून ओढा पात्रात केली गेलेली प्रचंड अतिक्रमणे, आटपाडी ओढा ते धांडोरओढा पात्रा पर्यतच्या आटपाडीच्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा शासकीय जागा, देवस्थान इनाम जमीन वर्ग – ३ च्या जमीनीवर केल्या गेलेल्या अतिक्रमणांबद्दलही या भाजपा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवेदनात सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसते .
          आटपाडी तलावाच्या पाणी पुरवठा विहीरीला लागून आटपाडीकडे झेपावणाऱ्या मुळ ओढ्याचे पात्र अंदाजे ७० ते १०० मीटर इतके प्रचंडच होते . पावसाळ्यात दुथड़ी भरून पाणी वाहणाऱ्या पाण्याच्या रुंदीची मर्यादा १५० मीटर पर्यत जात असे . सध्या या ओढ्याचे पात्र संपविण्याची स्पर्धा अनेकांकडून सुरू आहे . काही ठिकाणी अतिक्रमणे एवढी बेफामपणे केली गेली आहेत की दुसऱ्या बाजुचे पात्र आणि पहिल्या बाजुचे पात्र जवळ जवळ एक होत आहे, असे दिसून येते . अनेक राजकीय नेत्यांच्या वरद हस्ताने या अतिक्रमणांना बळकटी मिळाल्याचे सर्वश्रुत आहे . आटपाडी तलावापासून निघणाऱ्या दोन्ही ओढा पात्रांची पुर रेषा निश्चित केली जावी . या ओढा पात्रातील सर्वच अतिक्रमणे तातडीने नेस्तनाबुत केली जावीत . तसेच देवस्थान इनाम वर्ग – ३ जमीनीवरील आणि आटपाडी शहरातील अनेक ठिकाणच्या शासकीय जागांवर केली गेलेली अतिक्रमणे तातडीने काढावीत . ही मागणी मी पुन्हा शासकीय अधिकाऱ्यांसह, सत्ताधारी पक्षाच्या नेतेमंडळीकडे करीत आहे .
          भाजपा आघाडीच्या पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका यांनी शुक्र ओढ्यातील अतिक्रमण काढण्याची मागणी केली आहे . मग गदिमा नाट्यगृह ते आटपाडी बाजार पटांगण, फरशी पुला लगतच्या ओढ्याला शुक्र ओढाच म्हणतात ना ? मग या ओढा पात्रात खोकी धारकांच्या पुनर्वसनासाठी उभारण्यात येत असलेले प्रचंड विस्तीर्ण लांब गाळे सदृश्य शेड, हे ही शुक्र ओढ्यातील नव्याने सुरु असलेले अतिक्रमण ठरत नाही का ? यासाठी शासनाने खास परवानगी दिली आहे का ? आणि हे गाळ्यांचे लांब शेड अतिक्रमण ठरत असेल तर ते ही, भाजपाईंच्या मागणी प्रमाणे काढायचे का ? यावरही शासनकर्त्यांनी डोळे उघडे ठेवून बघीतले पाहिजे . आणि यथायोग्य कारवाई केली पाहिजे . पुर्वी आटपाडी ग्रामपंचायतीच्या काळात ओढ्यालगत बांधलेल्या गेलेल्या गाळ्यांना आणि व्यापारी संकुलाला शासनाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतल्याची चर्चा होती . ही बांधकामे अनधिकृत ठरली असतील तर या पासून ६० फुट आत ओढा पात्रात उभारण्यात येत असलेली संरक्षक भिंत आणि पुनर्वसीत खोक्यांसाठीचे गाळे अधिकृत ठरतात का ? याची ही चिकित्सा झाली पाहिजे .
          सत्तेच्या पदावरील एखाद्या नेत्याने अतिक्रमण केल्यास त्याचे पद बरखास्त केले जात असेल तर आटपाडी शहराच्या अतिक्रमण वाढीस अप्रत्यक्ष – प्रत्यक्ष हातभार लावणाऱ्या काही लोकप्रतिनिधींवर आणि शासनाच्या अधिकाऱ्यांवर शासन कारवाई करणार का ? अशी विचारणा सादिक खाटीक यांनी केली आहे .
          आटपाडी शहरातल्या आणि आटपाडीच्या दोन्ही ओढा पात्रातल्या अतिक्रमणा संदर्भाने लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात आपण आदरणीय लोकायुक्त महोदयांकडे अथवा शासनाच्या उच्च पदस्थ अधिकारी महोदयांकडे दाद मागणार असल्याचे सादिक खाटीक यांनी शेवटी स्पष्ट केले .
Post Views: 30
Previous Post

५ वी ते १० वीच्या शाळांमध्ये कला शिक्षक देण्याचा महत्त्वाचा निर्णय

Next Post

विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचा जागर; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचा जागर; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ संपन्न

विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचा जागर; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये 'स्मार्ट इंडिया हॅकेथॉन' संपन्न

ताज्या बातम्या

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रातर्फे पुणे येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषदेचे यशस्वी आयोजन.

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रातर्फे पुणे येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषदेचे यशस्वी आयोजन.

September 10, 2026
विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचा जागर; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ संपन्न

विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचा जागर; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ संपन्न

September 10, 2026
आटपाडीतील अन्य अतिक्रमणांना भाजपाचा पाठींबा आहे का ?

आटपाडीतील अन्य अतिक्रमणांना भाजपाचा पाठींबा आहे का ?

September 10, 2026
५ वी ते १० वीच्या शाळांमध्ये कला शिक्षक देण्याचा महत्त्वाचा निर्णय

५ वी ते १० वीच्या शाळांमध्ये कला शिक्षक देण्याचा महत्त्वाचा निर्णय

September 10, 2026

सोलापूरकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी ‘थाळी नाद’ आंदोलन!

September 10, 2026
पोळा सनानिमित्त बळीराजाला मोफत कांदा बियाण्याचे वाटप

पोळा सनानिमित्त बळीराजाला मोफत कांदा बियाण्याचे वाटप

September 10, 2026

समायोजन रखडले ; वेतनही थांबले

September 10, 2026
अकलूजच्या जिल्हा परिषद शाळेत पर्यावरण पूरक गणपती व बैल बनवणे कार्यशाळा संपन्न

अकलूजच्या जिल्हा परिषद शाळेत पर्यावरण पूरक गणपती व बैल बनवणे कार्यशाळा संपन्न

September 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1187480

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!