सोलापूर : पद्मशाली शिक्षण संस्था, सोलापूर संचालित कुचन प्रशाला, कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण, सोलापूर येथे श्री गणेशाची प्रतिष्ठापना भक्तिमय वातावरणात करण्यात आली. राजकुमार कडदास आणि त्यांच्या सुविद्य पत्नी ज्योती कडदास यांच्या हस्ते श्रींची महाआरती करण्यात आली. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाच्या उत्स्फूर्त सहभागाने श्रींची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
जोशपूर्ण व उत्साही वातावरणात निघालेल्या या मिरवणुकीने जोड बसवन्ना चौक, आंध्र भद्रावती चौक ते कुचन प्रशाला परिसर असा मार्गक्रमण केले. लेझीम पथकातील विद्यार्थिनींनी आपल्या उत्कृष्ट लेझीम सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी स्वतः लेझीम खेळून विद्यार्थिनींचा उत्साह द्विगुणित केला. त्यांच्या सहभागामुळे मिरवणुकीतील उत्साहाला विशेष रंगत आली. भक्तिमय वातावरण, ढोल-ताशांचा गजर आणि विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाच्या आकर्षक सादरीकरणामुळे श्री गणेशाची मिरवणूक उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
या प्रसंगी कुचन प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाळे, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू सर, मल्लिकार्जुन जोकरे व प्रणिता सामल तसेच प्रशाला व महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुचन प्रशालेतील माजी विद्यार्थी महेश मादास, मधुकर द्यावरकोंडा, आकाश फुके, किरण मुनगापाटील, लोकेश गुलापल्ली, अक्षय नंदाल यांनी प्रशालेस श्री ची मूर्ती भेट दिली.



















