सोलापूर – विद्यार्थी आपल्या कामात जेव्हा यशस्वी होतो तेव्हा शिक्षकाला मनस्वी आनंद होतो. तसेच आपला एक साथीदार कामांमध्ये उत्कृष्टरित्या कामात यशस्वी होत असेल तर त्याचे कौतुक करणे आपले कर्तव्य असल्याचे मत डॉ. प्राचार्य जमील दफेदार यांनी व्यक्त केले.
हेरिटेज लॉन येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात ते पुढे बोलताना म्हणाले की शिस्त, ज्ञान आणि राष्ट्रनिर्माणाचे संदेश देणाऱ्या सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा आदर्श घेऊन सर्व इंजिनियर्सनी देशाच्या विकासात आपला सहभाग नोंदवावा असे त्यांनी आवर्जून सांगितले. आणि गुणवंत अभियंता म्हणून सन्मान केलेल्या माहेश्वरी कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रमुख नंदकिशोर मुंदडा तसेच यावेळी असोसिएशनच्या गुणवंत पाल्यांचा देखील सुनील फुरडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. प्राचार्या शुभदा उपासे यांचा सत्कार सौ. सुनीता जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.
इंजिनिअर्स डे चे औचित्य साधून ए. आय.या वर डॉक्टर प्रा. प्रदीप तपकिरे यांचे प्रेझेंटेशन व मार्गदर्शन झाले. याचा वापर करून आपण वेळेची बचत करू शकतो आणि उत्तम – उत्तम स्ट्रक्चर निर्माण करू शकतो असे मत त्यांनी मांडले. अल्ट्राटेक चे विजय चव्हाण यांनी गुड प्रॅक्टिस इन कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री संदर्भातली माहिती उपस्थितांना दिली. इंजिनीअर्स डे चे औचित्य साधून 50 अभियंत्यांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना असोसिएशनचे अध्यक्ष बी.एम. जाधव यांनी केले. तर आभार सचिव संतोषकुमार बायस यांनी मानले. सूत्रसंचालन नर्मदा कनकी यांनी मानले. पाहुण्यांचा परिचय इंजि. वैभव होमकर, इंजि. मनोज महिंद्रकर, इंजि. गणेश इंदापुरे, इंजि. प्रशांत मोरे यांनी करून दिला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी इंजि. इफ्तेकर नदाफ, इंजि. गणेश अन्नलदास, इंजी. सुनील दुधगुंडी, , इंजी. मनोहर लोमटे, , इंजी. प्रवीण हेडगिरे, , इंजी. जवाहर उपासे, , इंजी. हनुमंतप्रसाद गज्जम, , इंजी. दत्तात्रय घोडके, , इंजी. नितीन पवार, , इंजी. हरी चव्हाण व असोसिएशन च्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
या वेळी माजी अध्यक्ष इंजि.मनोज म्हेत्रस,इंजि.इंजी. इंजि.नामदेव म्हेत्रस,इंजि.अजय पाटील इंजि. प्रकाश तोरवी, इंजि.अमोल मेहता या सह असोसिएशन चे बहुसंख्य इंजिनिअर उपस्थित होते.
फोटो ओळी; असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर सोलापूर यांच्या इंजिनिअर्स डे कार्यक्रमानिमित्त उद्घाटन करताना अल्ट्राटेकचे विजय चव्हाण, प्राचार्य डॉ. जमील दफेदार, एक्झि. इंजि. अनिस खैरदी, एसीसीई सचिव इंजि. संतोषकुमार बायस, इंजि. प्रदीप तपकिरे, अध्यक्ष भगवान जाधव,मनोज महिंद्रकर, इंजि. वैभव होमकर ( फोटो – जयेश पटवा )



















