पंढरपूर – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांच्या वतीने आयोजित श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवात दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रामध्ये देवश्री दंडवते यांनी द शास्त्रीय संगीतामध्ये राग भुप तिलवडा तालात गाऊन शास्त्रीय संगीताची मेजवानी दिली.त्यानंतर जय दुर्गे भवानी,नाचत गुरुभजनी,मी गातो नाचतो, कृष्ण देखिला सुरेल अभंग अगा वैंकुठीच्या राया भैरवी ने भक्तीरसपूर्ण स्वरांनी रसिकांना सुरेल मेजवानी दिली.त्यानंतर द्वितीय भारताला आपल्या आवाजाने वेड लावणारी ज्ञानेश्वरी गाडगे हिच्या सुरेल श्रवणीय गायनाची सुरुवात राग यमन या रागाने करत राजस सुकुमार मदनाचा पुतळा,जय देवी माता भवानी,येग येई विठाबाई,सोहम वर डमरू बाजे,कृष्णाला भुलवले भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, आणि शेवटी लय नाही लय नाही मागण या भैरवीने गायनाची सांगता करत रसिकांना आत्मानंद देणारी अनुभूती देत गायन सेवेची दुसरी नवरात्रीची सुरेल माळ विठूराया चरणी अर्पण केली.
या वेळी त्यांना सुरेल साथसंगत माऊली खरात, ज्ञानेश्वर दुधाणे, माऊली पिसे,सुमंगल टेंगसे,ओजस रानडे, निवेदन माधव कुलकर्णी आदींनी केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि आभार ज्ञानेश्वर दुधाणे यांनी मानले.
दरम्यान महोत्सवाच्या उर्वरित दिवसांमध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक, गायिका यांच्या सुरेल कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Post Views: 18