सांगोला – सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, मेथवडे (ता.सांगोला) येथे स्टे फाईन मल्टिव्हेंचर पीव्हीटी एलटीडी, मुंबई या संस्थेमार्फत महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृतीसाठी, कॅन्सरमुक्त महिला, प्लास्टिक मुक्त महिला या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यास विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा अनिता दिलीपकुमार इंगवले यांनी दिली. प्रमुख वक्त्या व स्टे फाईन मल्टिव्हेंचर कल्याण, मुंबईच्या ब्रॉन्झ डायरेक्टर स्वाती महानूर यांनी महिलांमधील वाढती कॅन्सरची समस्या, त्यामागील कारणे व उपाययोजना याबद्दल सविस्तर माहिती दिली. महिलांनी, विद्यार्थिनींनी मासिकपाळीमध्ये प्लास्टिक नॅपकिनचा वापर टाळावा त्याऐवजी कॉटनयुक्त, केमिकल मुक्त ओनियन सॅनिटरी नॅपकिन वापरावे. तसेच त्यांनी बाजारातील उपलब्ध असलेले सामान्य दर्जाचे नॅपकिन व केमिकल मुक्त ओनियन सॅनिटरी नॅपकिन यातील फरक प्रात्यक्षिकासहित सादर करून सविस्तर माहिती दिली. मासिक पाळीमध्ये महिलांना होणार त्रास व त्याचा शरीरावर होणारे दुष्परिणाम व संसर्गजन्य आजार याबद्दल जागरूकता असावी असे मत त्यांनी व्यक्त केले. सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन डॉ.एम.आय.मुजावर यांनी केले. या कार्यशाळेस सर्व विद्यार्थिनी, महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.