बार्शी – नवरात्रोत्सवातील देवीच्या आठव्या माळेनिमित्त बार्शी रनर्स क्लबतर्फे आज बार्शी ते श्री येडाई देवी मंदिर, येरमाळा अशी ३० किलोमीटरची भक्तिमय रनिंग आयोजित करण्यात आली होती. पहाटे बार्शी येथील शिवसृष्टी येथून या रनिंगला उत्साहात सुरुवात झाली.
बार्शी-पांगरी मार्गे धावपटूंनी येरमाळ्याच्या दिशेने धाव घेतली. वातावरणातील दमटपणा आणि आव्हानात्मक परिस्थिती असूनही सर्व धावपटूंनी जिद्द, चिकाटी आणि उत्साहाच्या जोरावर ३० किलोमीटरचे अंतर यशस्वीरीत्या पूर्ण केले.
रनिंगदरम्यान धावपटूंच्या आरोग्याची काळजी घेत बार्शी रनर्स क्लबतर्फे मार्गावर ठिकठिकाणी पाणी, फळे आणि हायड्रेशनची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे धावपटूंना आवश्यक ऊर्जा आणि प्रोत्साहन मिळाले.
येरमाळा येथील श्री येडाई देवी मंदिराच्या पायथ्याशी या रनिंगची सांगता झाली. त्यानंतर श्री. सचिन पाटील सर यांच्यातर्फे सर्व धावपटूंसाठी उत्कृष्ट आणि आरोग्यदायी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.
या उपक्रमातून श्रद्धा, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, सातत्य आणि एकजुटीचा संदेश देण्यात आला. धार्मिक श्रद्धेसोबतच आरोग्याची जपणूक करण्याचा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.
सहभागी धावपटू-अमोल ताकभाते, निलेश खळदकर, वासुदेव अण्णा ढगे, बंडू भोरे, अजित मिरगणे, डॉ. नवदीप लोकरे, रणजित पाटील, अमृत खेडकर, श्रेयस परदेशी, करण पाटील, प्रकाश माळी, किरण माळी, युवराज करळे, गणेश माने, रमेश मोरे, रवी कदम, प्रकाश फुरडे, रवी बजाज, ज्ञानेश्वर खुने, सचिन जगताप, संभाजी नवले, संतोष घावटे, मोरे मेजर.