कै.कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठान, कोळथरे मार्फत ग्रामीण भागातील रुगणांच्या सोयीसाठी रूग्णोपयोगी साहित्य केंद्राचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दाभोळ येथे अशाप्रकरचे केंद्र याआधी सुरू झाले असून आज पंचनदी-कोळथरे या दोन ग्रामपंचायत क्षेत्रातील रुग्णांसाठी कै.डॉ.मधुकर भिकाजी लुकतुके रुग्णोपयोगी साहित्य केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
डॉक्टर लुकतुके यांचे चिरंजीव उद्योजक केदार लुकतुके, चिपळूण येथील उद्योजक गुरु सोहोनी , प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिपीन दादा पाटणे , कोषाध्यक्ष दीपक महाजन , कार्यवाह गंगाराम इदाते , उपाध्यक्ष मिहीर महाजन , केंद्र प्रमुख विद्याधर जोशी यांच्या उपस्थितीत कोळथरेच्या आनंदी गोपाळ महाजन विद्यामंदिर येथे उद्घाटन संपन्न झाले !
या केंद्राचे उद्घाटन माझ्या हस्ते होत असताना डॉक्टर लुकतुके यांनी जे कार्य केले ते अजरामर करण्याचे काम कै.मामांच्या नावाने असलेले प्रतिष्ठान करते आहे याचा विशेष आनंद असल्याचे केदार लुकतुके यांनी नमूद केले. याप्रसंगी विद्याधर जोशी, अविनाश काष्टे, नरेंद्र डोरलेकर, अमित नाचरे,प्रभाकर राणे,आदित्य देपोलकर, ओंकार कात्रे,प्रशांत जाधव,निलेश येल्वे , सूर्यकांत मालगुंडकर,बापू संकुलकर,संदीप महाडीक,गजानन बडे , सुनील सोमण,अमेय हुंबरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मिहिर महाजन यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की डॉक्टर लुकतुके यांच्या नावाने आणखी अशाच २ केंद्रांचे आपण २४ तारखेला उद्घाटन करणार आहोत, संपूर्ण दाभोळ जिल्हा परिषद गटातील पेशंटसाठी अशाच प्रकारे आरोग्य विषयातील स्वयंपूर्ण व्यवस्था निर्माण करण्याचा संकल्प असल्याचे नमूद केले.