सोलापूर – शालेय शहर सॉफ्टबॉल स्पर्धेत द. का. आसावा प्रशालेने १४ वर्षाखालील मुलींबरोबरच १७ वर्षाखालील मुलींनीही विजेतेपद पटकावित प्रशालेस दुहेरी मान मिळवून दिला.
अंतिम सामन्यात त्यांनी सिद्धेश्वर कारखाना प्रशालेचा 10-9 असा एका डावाच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. या स्पर्धेत अक्षरा कापसे, श्रद्धा तोडकरी, आनाया शेख, यांनी उत्तम कामगिरी केली. विजयी संघाचे संस्थेचे स्थानिय सचिव डाॅ. महेशजी चोप्रा, प्रशासक डॉ. विजयकुमार उबाळे, मुख्याध्यापिका मनीषा पाटील तसचे पर्यवेक्षिका सुनीता गवळी यांनी अभिनंदन केले. विजेत्या संघास प्रशालेचे क्रीडाशिक्षक प्रमोद कुनगुलवार यांचे मार्गदर्शन लाभले.
——





















