बार्शी – श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित जिजाऊ सावित्री रमाई महिला बळ विकास समिती बार्शी यांचे वतीने १६ ऑक्टोबर रोजी श्री शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी वसतीगृह मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. अबोली सुलाखे, प्रमुख पाहुण्या बार्शीच्या नगराध्यक्षा तेजस्विनीताई कथले या उपस्थित होत्या. महिला समितीने सामाजिक भान राखत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या, समाजाला दिशा देणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा गौरव केला.
यात प्रामुख्याने सौ.शोभा दिगंबर विधाते(महिला शेतकरी), डॉ. पल्लवी तांबारे (वैद्यकीय) ,सीमा अप्पाशा डोंगरीतोट(चौगुले) ( पीएसआय,सोलापूर) ,सौ. विमल सिद्राम माळी (कवयित्री आधुनिक बहिणाबाई, अनगर), सौ.सोनाली रमेश गोखले (असिस्टंट पब्लिक प्रेसिक्युटर) , सौ.शिल्पा मठपती (पत्रकार ),सौ. दिपाली झालटे (उद्योजिका), श्रीम.वैष्णवी जानराव (कला) ,आणि श्रीम.भारती गोरखनाथ सोनवणे ( परिचारिका, जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी). या नवदुर्गांचा यथोचित सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी नवदुर्गांनी आपली मनोगते व्यक्त केली. विद्यार्थिनींना आणि उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. मोबाईलचा अतिवापर टाळून आपले ध्येय समोर ठेवून मार्गक्रमण करण्याचे आवाहन केले. सौ. विमल माळी यांच्या कवितांनी वातावरणात हास्याचे फवारे उडवले.यावेळी संस्थेचे सचिव श्री. प्रकाश पाटील आणि संस्थेचे खजिनदार श्री.जयकुमार शितोळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीच्या उपाध्यक्षा प्रा. मंजुषा श्रीमंगल , शब्दसुमनांनी स्वागत समितीच्या खजिनदार डॉ. लाजवंती राठोड, समितीचे अहवाल वाचन समितीच्या सचिव डॉ. ज्योती यादव यांनी केले. यावेळी महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती.कविता धावणे, महिला समितीच्या माजी अध्यक्षा सौ.माधुरी शिंदे, समितीच्या कार्याध्यक्षा श्रीमती संगीता गायकवाड, समितीच्या सहसचिव डॉ. ज्योती माळी, समितीच्या सर्व कार्यकारिणी सदस्या आणि संस्थेतील महिला शिक्षिका तसेच वसतीगृहातील विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार महिला समितीच्या अध्यक्षा डॉ. स्मिता सुरवसे यांनी मानले. सूत्रसंचलन डॉ. वंदना यादव यांनी केले.
Post Views: 10