सोलापूर – सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी माजी आमदार दिलीप माने, जयवंतराव जगतापांसह ९ जणांनी अर्ज दाखल केले आहेत, तर आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार बाबासाहेब देशमुखांनी उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी दिली आहे.
माजी आमदार दिलीप माने, जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज माने, नगरसेवक धनंजय भोसले, जयवंतराव जगताप, शंभूराजे जगताप, बिराप्पा इंगळे, राधा सुरवसे,
हणमंत मासाळ, भीमराव येडवे असे एकूण ९ अर्ज
बुधवारी दाखल झाले. माजी आमदार दिलीप माने, जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज माने, नगरसेवक धनंजय भोसले, जयवंतराव जगताप, शंभूराजे जगताप या सगळ्यांनी सोसायटी मतदार संघातून अर्ज भरला आहे. तर बुधवारी २५ जणांनी ६६ अर्ज घेतले.
आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदादार बाबासाहेब देशमुख,माजी आमदार प्रशांत परिचारक, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, संजीव पाटील, अनिकेत संजय पाटील, रोहिणी तडवळकर, विश्वनाथ नागूर, रावसाहेब फटे यांचा अर्ज घेतलेल्यांमध्ये समावेश आहे. आतापर्यंत एकूण १५ अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारी २१९ , मंगळवारी १२३ तर बुधवारी ६६ असे एकूण ४०८ अर्ज नेले आहेत. त्यामुळे आज आणि उद्या अर्ज भरण्यासाठी अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे.






















