पंढरपूर – 3वर्ष 10 महिने दादांच्या सहवासात एक अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली हें मी माझं भाग्य समजतो. अत्यंत स्वच्छता प्रिय नेता स्वतःही स्वच्छता ठेवायचे अन शहर ही स्वच्छता बाबतीत एकदम काटेकोर असायचे.दिलेला शब्द पाळणारा नेता अन जे करू शकतो तेच शब्द देणारा म्हणून दादांना सर्वांना परिचित होते, मोठ्यापासून ते लहान मुलापर्यंत सर्वांचे आवडते दादा होते. दादांच्या जाण्याने महाराष्ट्र चे खूप मोठे नुकसान झालं. स्व.दादांच्या दातृत्वाचा वसा श्रीकांत शिंदे यांनी जपला आहे असे प्रतिपादन पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले.
दिनांक 28 जानेवारी महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्ववान उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचे 9 वे मासिक स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत आबा शिंदे व राष्ट्रवादी परिवार अजितदादा पवार पक्ष यांच्या वतीने 1 लाख 10 हजार रूपये किंमतीचा ए.आय इंटरऍक्टिव्ह पॅनल पंढरपूर तालुक्यातील सनराईज पब्लिक स्कूल शेळवे या प्रशालेस भेट देण्यात आला. श्रीकांतआबा शिंदे यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ त्यांच्या प्रत्येक मासिकाला वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम घेतले असून आज नवव्या मासिकाच्या निमित्ताने स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ सनराईज पब्लिक स्कूल, शेळवे या प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या अध्ययावत व आधुनिक शिक्षण प्रणालीसाठी ग्रामीण भागातील दर्जेदार व गुणवत्ता असलेल्या शाळेसाठी व तेथील विद्यार्थ्यांसाठी तब्बल सव्वा लाखाचा ए.आय इंटिग्रेटेड पॅनल भेट म्हणून दिला. या कार्यक्रम प्रसंगी ,राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वर्षाताई शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मोहम्मद उस्ताद,जिल्हा सरचिटणीस सारंग महामुनी,वरिष्ठ उपाध्यक्ष प्रदीप तांदळे,खेड भाळवणीचे उपसरपंच लक्ष्मण तात्या साळुंखे,माजी उपसरपंच शहाजी पाटील,शेळवे गावचे मा. उपसरपंच किरणदादा गाजरे, पिराची कुरोलीचे युवा उद्योजक शंकर शिंदे,खेड भाळवणीचे युवा उद्योजक सचिन दादा साळुंखे तसेच नुकतीच एम.बी.बी.एस साठी निवड झालेले सनराईज पब्लिक स्कूलचे विद्यार्थी चि.प्रज्योत साळुंखे व त्यांचे पालक श्री.पांडुरंग साळुंखे इत्यादी उपस्थित होते.
पुढे बोलताना मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी ही आपल्या अध्यक्षीय भाषणातून आपण जेंव्हा दादांच्या नेतृत्वाखाली बारामती येथे काम करत होतो, तेव्हाच दादांच्या कामाचा आवाका,शिस्त आणि काटेकोरपणा आम्हाला पहायला आणि शिकायला मिळाल्याचे त्यांनी सांगितले,तसेच ग्रामिण भागात ही सनराईज पब्लिक स्कूल अतिशय गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण या विद्यार्थ्यांना देत असल्याने शाळेची प्रगती होत असल्याचे त्यांनी सांगितले.
ए.आय.पॅनलच्या उदघाटन प्रसंगी स्व.अजित दादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्व मान्यवर व शिक्षकांच्या वतीने दादांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाधान तुकाराम गाजरे यांनी केलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा अध्यक्षा सौ.वर्षाताई शिंदे यांनी ही मनोगत व्यक्त केले.
प्रशालेचा विद्यार्थी चि.प्रज्योत पांडुरंग साळुंखे यांची वैद्यकीय क्षेत्रातील एम.बी.बी.एस या कोर्स साठी पालघर येथील वेदांत मेडिकल कॉलेज येथे निवड झालेबद्दल त्यांचा सहपरिवार आदर सत्कार करण्यात आला.
. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक मोहन गायकवाड यांनी केलं तर कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष अजित लोकरे यांनी केल,संस्थेचे संस्थापक सचिव अंकुश गाजरे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी, वाहनचालक यांनी अथक परिश्रम घेतले.