अकलूज – सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम 2026-2027 सुरु असून हंगामामध्ये ऊस तोडणी वाहतुकीचे कामाकरिता आलेल्या पशुधनासाठी लसीकरण मोहीम राबवण्यात आली. आरोग्याची तपासणी शंकरनगर येथील पशुवैदयकीय अधिकारी डॉ. काळेसो व त्यांच्या पथकाने करून पशुधनास दयावयाचा योग्य खुराक, आरोग्य विषयक घ्यावयाची काळजी याबाबतची माहिती देण्यात आली. कारखाना हंगामामध्ये वेळोवेळी आवश्यकतेनुसार शिबीराची अथवा जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्याची परंपरा नेहमीच या कारखान्याने जपलेली आहे. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक मा.श्री. विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच संचालिका मा.कु. स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नाने विविध उपक्रम राबविले जातात. सध्याच्या वातावरणानुसार पशुधनास कोणताही आजार होऊन त्यांच्या जीवितास धोका होऊ नये याकरिता कारखान्याने या शिबिराचे आयोजन करुन तोडणी वाहतूक कामासाठी आलेल्या पशुधनाची योग्य ती काळजी व खबरदारी घेतलेली आहे. याप्रसंगी कारखान्याचे शेतकी अधिकारी श्री. रविराज चव्हाण व सर्व स्टाफ तसेच बैलगाडी मुकादम आणि बैलगाडीवान उपस्थित होते.
Post Views: 7