नगरपालिका निवडणूक २०२५ मध्ये खलिफा कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवली. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अल्पमताने पराभव स्वीकारावा लागला असला, तरी पक्षाचे आठ नगरसेवक निवडून आल्याने पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीला नवी दिशा मिळाल्याचे मत पक्षाचे शहर कार्याध्यक्ष नरसिंह लक्ष्मण मेटकरी यांनी व्यक्त केले.
नगरपालिका निवडणुकीत आठ नगरसेवकांना स्वबळावर निवडून आणण्यात खलिफा कुरेशी यांच्या नेतृत्वाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिल्याचे मेटकरी यांनी नमूद केले. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसले, तरी नगरसेवकांच्या माध्यमातून पक्षाला स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्याची संधी मिळाली. हीच पुढील राजकीय वाटचालीसाठी महत्त्वाची पायाभरणी ठरल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाने डॉ. प्रतापसिंह पाटील यांना अधिकृत उमेदवारी दिली होती. त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विजयामुळे कार्यकर्त्यांना नवे बळ आणि आगामी काळात पक्षवाढीसाठी प्रेरणा मिळाल्याचे मेटकरी यांनी म्हटले.
नगरपालिका निवडणुकीतील संघटनात्मक बांधणी आणि पदवीधर मतदारसंघातील विजय या दोन्ही घडामोडी पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत, खलिफा कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या संघटनात्मक पायाभरणीची त्यांनी दखल घेतली.
— नरसिंह लक्ष्मण मेटकरी
शहर कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)
Post Views: 12