अणदूर – धाराशिव लातूर बीड विधानपरिषद मतदार संघातील नव निर्वाचित आमदार बसवराज पाटील यांनी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांची त्यांच्या निवास स्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
स्थानिक स्वराज संस्थेच्या धाराशिव लातूर बीड विधानपरिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला त्या मध्ये भारतीय जनता पक्षाचे बसवराज पाटील यांचा मोठ्या फरकाने दणदणीत विजय झाला त्या नंतर त्यांनी अणदूर येथे येऊन माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे आशीर्वाद घेतले या वेळी चव्हाण परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला, या वेळी चव्हाण म्हणाले की ‘परत एकदा विधिमंडळात माझे सहकारी बसवराज पाटील हे गेल्याचा आनंद खूप झाला असून त्यांच्या प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव या तिन्ही जिल्ह्यातील विकासा करिता निश्चित होईल अशा भावना व्यक्त केल्या, या वेळी खुदावाडी ग्रामस्थ, विविध संस्थांच्या वतीने व श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट च्या वतीने बसवराज पाटील यांचा श्री खंडोबा ची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला या वेळी मुकुंद डोंगरे,सुनील चव्हाण, रणवीर चव्हाण, अभिजित चव्हाण,साहेबराव घुगे,धनराज मुळे, सिद्धाराम धमुरे, राम जवळगे, बालाजी मोकाशे, डॉ. नागनाथ कुंभार, डॉ. विवेक बिराजदार,पृथ्वीराज मुळे, राजकुमार गाढवे,शरणप्पा कबाडे, राजू पाटील आदी मान्यवरासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 7