सोलापूर : श्री समर्थ सच्चिदानंद वीरनाथ मल्लिनाथ महाराज संस्थान श्री क्षेत्र औसा येथील ४थे पिठाधीपती सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या धर्मपत्नी तथा विद्यमान पिठाधीपती सद्गुरू श्री गुरुबाबा महाराज औसेकर आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या मातोश्री श्रीमती लिलाबाई ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या निधनामुळे समस्त औसेकर शिष्य परिवाराकडून श्रद्धांजली सभेचे आयोजन बुधवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता श्रीराम मंदिर देवस्थान टेलिफोन भवन मागे बाळीवेस येथे करण्यात आले असून विविध क्षेत्रातील मान्यवर व शिष्यगणानी उपस्थित राहून मनोगत व्यक्त करण्याचे आवाहन एका पत्रा द्वारे करण्यात आले आहे
—–
Post Views: 28