सोलापूर – राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून सोलापूर शहर व जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ, श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरीज्, पंढरपूर) आणि स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (सोलापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार वितरण सोहळा’ होईल. बुधवार २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील इंटरनॅशनल कॉन्फरन्स हॉलमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे.
या सोहळ्याचे उद्घाटन व प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. संतोष गवळी (शारीरिक शिक्षण संचालक) आणि प्रा. सचिन गायकवाड (व्यवस्थापन परिषद सदस्य) उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वेरीचे संस्थापक व एस.व्ही.आय.टी. सोलापूरचे अध्यक्ष प्रा. डॉ. बी. पी. रोंगे भूषवणार आहेत.
तसेच भारत इंगवले (राज्य समन्वयक, क्रीडा शिक्षक महासंघ), प्रा. संतोष खेंडे (जिल्हाध्यक्ष, सोलापूर जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ), सुहास छंचुरे (शहराध्यक्ष, सोलापूर शहर शारीरिक शिक्षण क्रीडा शिक्षक महासंघ) आणि रणजीत लोहार (तालुकाध्यक्ष तथा निवड समिती सदस्य) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
या विशेष सोहळ्यात सोलापूर शहर व जिल्ह्यातील १५० क्रीडा शिक्षकांना ‘आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार’ प्रदान करून गौरवण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप ट्रॉफी, सन्मानपत्र, फेटा, शॉल आणि विठुरायांची प्रतिमा असे असणार आहे.
या कार्यक्रमास सोलापूर शहर व जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक महासंघाचे सर्व तालुकाध्यक्ष, सचिव व सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असून, क्रीडा प्रेमीनी उपस्थित राहावे, असे आवाहन क्रीडा शिक्षक संघटना आणि स्वेरीज् कॉलेजच्या वतीने करण्यात आले आहे.
—–
















