श्रीपूर – येथिल गौतम शंकर लोंढे यांनी आपली आई वत्सुलाताई लोंढे यांच्या स्मृती निमित्त श्रीपूर येथिल जि .प . शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्य वाटप करून स्मृतीदिन साजरा केला .
या प्रसंगी ब्रिमा सागर डिस्टलरीचे डे . फॅक्टरी मॅनेंजर चंद्रकांत भागवत , नरेश पाठक यांचे हस्ते शालेय साहित्य देणेत आले .
प्रथम प्रा . नरेंद्र भोसले यांनी लोंढे कुटूंबाने अवांतर खर्चाला फाटा देवून सामाजीक कार्यातून आपल्या आईच्या स्मृती जपल्याचे सांगत कौतुक केले .
या वेळी चंद्रशेखर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक नागनाथ वाघमारे, शिक्षक ग . गो . जोशी, शंकर लोंढे ,महाळुंग – श्रीपूर नगरपंचायतीचे नगरसेवक प्रकाश नवगिरे, आरपीआय चे संदीप घाडगे , ज्ञानेश्वर सुरवसे, साहील साबळे , पत्रकार दत्ता नाईकनवरे , बंडोपंत रेडे,तुषार लोंढे , युवराज सावंत सर , अनिकेत ढावरे, राजकुमार नवगिरे , रमेश लोंढे, रंजना लोंढे , कविता सावंत, योगिता लोंढे , दिपाली ढावरे, हेमलता चव्हाण उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा . नरेंद्र भोसले यांनी केले .
Post Views: 5