सोलापूर – “श्री शिवलीलामृत ग्रंथ हा केवळ ग्रंथ नसून जीवन जगण्याची कला आहे. शिवभक्ती माणसाला संकटाशी लढण्याची शक्ती देते. आजच्या तरुण पिढीने आपल्या संस्कृती आणि परंपरेशी जोडले जाणे गरजेचे आहे. सकळेश्वर मंडळाने नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून हा वारसा जपला आहे, हे कौतुकास्पद आहे. एमके फाउंडेशन नेहमीच अशा धार्मिक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याचे प्रतिपादन एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी केले. मंद्रूप
येथील श्री सकळेश्वर नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित “श्री शिवलीलामृत ” ग्रंथ प्रवचन कार्यक्रमास एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी उपस्थिती लावली. यावेळी ते बोलत होते. यावेळी मंद्रूप जिल्हा परिषद सदस्य सोनाली कडते, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख अमर पाटील , संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष प्रशांत कडते , ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत मेंडगुदले मंडळाचे अध्यक्ष अमोगसिद्ध मुंजे, उपाध्यक्ष शिवानंद जोडमोटे, संस्थापक गौरीशंकर मेंडगुदले, सचिव सकळेश्वर पुजारी, निवृत मंडलाधिकारी सुरेश
जोडमोटे, वांगीचे प्राचार्य गिरीश कुलकर्णी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्र महोत्सवानिमित्त श्री शिवलीलामृत ग्रंथाचे प्रवचन आयोजित करण्यात येते. या ग्रंथ वाचनामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी मंडळाच्या वतीने सोनाली कडते, महादेव कोगनुरे, अमर पाटील व प्रशांत कडते यांचा सत्कार करण्यात आला.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...



















