Monday, April 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

डॉ. नरेंद्र दाभोलकर निकाल : 11 वर्षांचा प्रतीक्षा, 17 मिनिटात निकाल, कोर्टात काय काय घडलं?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
May 10, 2024
in maharashtra
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर निकाल : 11 वर्षांचा प्रतीक्षा, 17 मिनिटात निकाल, कोर्टात काय काय घडलं?
0
SHARES
54
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे: राज्यातील बहुचर्चित डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने शुक्रवारी निकाल जाहीर केला. 11 वर्षांपूर्वी पुण्यातील ओंकारेश्वर पुलाजवळ नरेंद्र दाभोलकर  यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पाच जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. यापैकी सचिन अंदुरे आणि शरद कळकर  यांना सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. तर दाभोलकर यांच्या हत्येच्या कटाचा आरोप असलेल्या  वीरेंद्र तावडे  विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे.

सत्र न्यायालयात नेमकं काय घडलं?

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर  तब्बल 11 वर्षांनी या खटल्याचा निकाल जाहीर होत असल्याने त्याबद्दल अनेकांना उत्सुकता होती. सकाळी 11 वाजताच्या सुमारास पुणे सत्र न्यायालयतील विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश पी.पी. जाधव कोर्ट परिसरात दाखल झाले. यानंतर सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी, बचावपक्षाचे वकील प्रकाश साळशिंगेकर, सीबीआयचे तपास अधिकारी कोर्टात दाखल झाले. आरोपी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हेदेखील यावेळी कोर्टात हजर होते. तर कोठडीत असलेल्या डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना न्यायालयात आणण्यात आले.

पाचही आरोपी न्यायालयात आल्यानंतर न्यायमूर्ती पी.पी. जाधव  यांनी कामकाजाला सुरुवात केली. सर्वप्रथम न्यायाधीशांनी तपास अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी संजीव पुनाळेकर यांनी दाखल केलेला अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर न्यायमूर्तींनी निकाल वाचनाला सुरुवात केली. यावेळी न्यायमूर्तींनी पाच आरोपींपैकी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असणाऱ्या विरेंद्र तावडे यांची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर संजीव पुनाळेकर ज्यांच्यावर आरोपींना शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिल्याचा आरोप होता, त्यांनाही न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. तसेच आरोपी विक्रम भावे हेदेखील निर्दोष असल्याचे न्यायमूर्तींनी सांगितले.

तर आरोपी क्रमांक दोन आणि तीन म्हणजे शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना खंडपीठाने कलम 302 आणि कलम 34 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले. या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या दोघांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास आणखी एक वर्षाचा कारावास होईल, असे न्यायालयाकडून निकालपत्रात नमूद करण्यात आले.

डॉ. हमीद दाभोलकरांचे वकील काय म्हणाले?

डॉ. दाभोलकर प्रकरणात न्यायालयाच्या निकालानंतर हमीद दाभोलकर यांचे वकील अभय नेवगी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी अकरा वर्षानंतर निकाल आल्यानंतर वकिलांनी नाराजी व्यक्त केली. या कटाच्या सूत्रधारापर्यंत पोहोचता आले नाही, हे आपल्या तपास यंत्रणांचं अपयश आहे. समाधान फक्त एवढं आहे की, ज्यांनी दाभोलकरांना गोळ्या घातल्या त्यांना शिक्षा मिळाली. पण कटाच्या मास्टरमाईंडपर्यंत अजूनही पोहोचता आलेले नाही. या प्रकरणाच्या तपासात हलगर्जीपणा होत असल्याबद्दल मी अगोदरच नाराजी व्यक्त केली होती.  दाभोलकर हे समाजसेवक होते, त्यांच्यावर दिवसाढवळ्या गोळीबार झाला. आम्ही याचे अनेक पुरावे सादर केले. आता निर्दोष सोडण्यात आलेल्या आरोपींविरोधात आम्ही वरच्या न्यायालयात धाव घेणार आहोत, असे नेवगी यांनी सांगितले.

Post Views: 48
Previous Post

11 वर्षांनी दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल; तीन आरोपी निर्दोष, तर दोन दोषी

Next Post

कोर्टाच्या निकालाचं स्वागत पण, निर्दोष सोडलेल्यांविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार; हमीद दाभोलकर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
कोर्टाच्या निकालाचं स्वागत पण, निर्दोष सोडलेल्यांविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार; हमीद दाभोलकर

कोर्टाच्या निकालाचं स्वागत पण, निर्दोष सोडलेल्यांविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार; हमीद दाभोलकर

ताज्या बातम्या

दडशिंगे पाटीजवळ भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू

April 20, 2026

वादळाचा तडाखा; घर कोसळून १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

April 20, 2026

रील बनवण्याच्या नादात चालकाने घेतला एका मुलाचा बळी

April 20, 2026

वेळापूर मधील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध ..

April 20, 2026

दिमाखात साजरी झाली भगवान परशुराम जयंती

April 19, 2026

युवक काँग्रेसच्या वतीने एक दिवसीय सत्याग्रह आंदोलन

April 19, 2026

पद्मशाली समाजाचे सुपुत्र नागेश कोंडा यांची न्यायाधीश पदी निवड झाल्याने सन्मान करण्यात आला

April 19, 2026

अक्षय तृतीया आहार अर्पणातून आत्मशुद्धीचा संदेश

April 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0820341

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697