सोलापूर ः निंबर्गी (ता. दक्षिण सोलापूर) येथे शुक्रवारी (ता. २८) प्रसिध्द व्याख्याते डॉ. वसंत हंकारे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. सायंकाळी ७.३० वाजता ग्रामदैवत श्री बसवेश्वर मंदिरासमोर हे व्याख्यान होणार असून ‘आई – बाप समजून घेताना’ हा व्याख्यानाचा विषय आहे.
श्रावण मासानिमित्त १३ ऑगस्टपासून निंबर्गी येथील श्रावण मास कार्यक्रम समितीने पुराण – प्रवचनाचे आयोजन केले आहे. कर्नाटकातील उमराणी (ता. चडचण, जि. विजयपूर) येथील प्रवचनकार वेदमूर्ती मुरुगेंद्र शास्त्री हे शिवशरण सिद्धरामेश्वर पुराणावर निरुपण करीत आहेत. या प्रवचनास निंबर्गी ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या श्रावण मास प्रवचनात शुक्रवारी रक्षाबंधनाचे औचित्य साधून डॉ. हंकारे यांचे विशेष व्याख्यान आयोजिले आहे. निंबर्गी परिसरातील सर्व गावांतील लहान मुले, युवा, प्रौढ आणि महिला अशा सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रावण मास कार्यक्रम समितीचे मार्गदर्शक अरुण बिराजदार व अध्यक्ष महेश करजगी यांनी केले आहे.
——
Post Views: 118