पिलीव – नवराञ म्हटल की नऊ दिवस उपवास विशेषत प्रत्येक घरात महीला मोठ्याप्रमाणात उपवास करतात .माञ यंदाच्या उपवासावर महागाईचा परिणाम अगदी स्पष्ट जाणवत होता.दरवर्षीपेक्षा यंदा महीलांना महागाईचा फटका बसला यामुळेच तर उपवाचा फराळ काटकसरीनेच करावा लागला .यंदा शाबुदाणा 100 ते 120 रुपये किलो गेल्या वर्षी चांगल्या प्रतीचा शाबुदाणा 80 रु किलो होता ,भगर यंदा 220 रु किलो जवळपास किलो मागे 30 ते 40 रुपयांपर्यंत दरवाढ यंदा झाली आहे, भगरीचे पिठ 200 रुपये किलो, शेंगदाणा 160 रुपये किलो, खाद्यतेल 160 ते 180 रुपये प्रती किलो, हिरवी मिरची 80 रुपये किलो यासह उपवासाठी लागणाऱ्या इतर सर्वच पदार्थाच्या किमतीमध्ये यंदा गतवर्षी पेक्षा मोठी दरवाढ झाली आहे. तर उपवासाठी लागणारी फळे केळी, सफरचंद किंवा इतर फळांच्या किमतीत सुद्धा यंदा मोठी दरवाढ झालयाचे पाहवयास मिळत आहे.यामुळेच तर सर्व सामान्य महीलांना यंदा नवराञीचा उपवास करताना मोठी आर्थिक ताणाताण करावी लागलयाचे पाहवयास मिळाले. एकतर यंदा दुष्काळाचे सावट त्यातच महागाईचे सावटाने नवराञीचा उपवास करताना मोठी आर्थिक काटकसर करावी लागली .