

माळशिरस . अन्न व औषध प्रशासन प्रशासनाने माळशिरस तालुक्यात नुकतीच मोठी कारवाई केल्याने खळबळ उडाली भेसळ प्रकरणी तक्रारी आलेले अथवा अन्न व्यवसायीकांनी अन्न व औषध प्रशासनाचा अधिकृत नोंदणी नसलेल्या व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे .
३० मे रोजीअन्न व औषध प्रशासनाचा परवाना न घेता अनधिकृतरीत्या व्यवसाय सुरू ठेवल्याचा ठपका ठेवत मे. जय हनुमान भाईनाथ दूध संकलन व शितकरण केंद्र,. पिसेवाडी वेळापुर (ता. माळशिरस ) येथील दूध डेअरीवर तर कमी दर्जा अथवाद लेबलदोष असल्याच्या संशयावरुन मे. जयकुमार दुलचंद दोशी, मु. पो. अकलुज, ता. माळशिरस, या पेढीची तपासणी करुन पामोलिन तेलाचा नमुना घेऊन उर्वरित साठा 997 किलो, किं.रु. 2,44,700/- चा साठा सिल करण्यात आला आहे . सहाय्यक आयुक्त सुनिल जिंतूरकर व अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. मंगेश लवटे यांचे सह पथकाने सदर कारवाई केली . असून अशा पद्धतीची भेसळ आढळल्यास संपर्कसाधण्याचे आवाहन केले आहे .
फोटो अकलूज येथील तेलपेढीवर कारवाई करताना अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी
Post Views: 7