Saturday, May 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर

तरुण भारतbyतरुण भारत
May 30, 2026
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी जाहीर झाली असून, शहरातील प्रमुख महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेसाठी मोठी चुरस पाहायला मिळाली. विशेषतः विज्ञान शाखेच्या कट ऑफने ऐंशी टक्क्यांचा टप्पा पार केल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशासाठी तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे.
वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या अनुदानित विभागासाठी ८२.२० टक्के गुणांवर प्रवेश बंद झाले असून विनाअनुदानित विभागासाठी ७४ टक्के कट ऑफ लागला आहे. कला शाखेसाठी येथे ३५.२० टक्के गुणांवर प्रवेश क्लोज झाले आहेत.
दयानंद महाविद्यालयात विज्ञान शाखेचा कट ऑफ ८१.८० टक्क्यांवर गेला असून कला शाखा ६०.४० टक्क्यांवर बंद झाली आहे. मुलींसाठी स्वतंत्र कट ऑफ अधिक राहिला असून विज्ञान शाखेसाठी ८५.२० टक्के तर कला शाखेसाठी ६६.८० टक्क्यांवर प्रवेश बंद झाले आहेत.
संगमेश्वर महाविद्यालयात विज्ञान शाखा ८० टक्क्यांवर बंद झाली असून कन्नड भाषिक विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के कट ऑफ राहिला आहे. वाणिज्य शाखेसाठी ६० टक्के तर कन्नड भाषिक विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के गुणांवर प्रवेश क्लोज झाले. कला शाखेसाठी येथे थेट प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, अकरावी प्रवेशासाठी जिल्ह्यातील आतापर्यंत सुमारे ४३ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना ३ जूनपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
पहिल्या प्रवेश फेरीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी ‘प्रोसिड फॉर अॅडमिशन’ या पर्यायावर क्लिक करून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित कागदपत्रांसह महाविद्यालयात उपस्थित राहून पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा नाही, त्यांनी ऑनलाइन नकार नोंदवणे आवश्यक राहणार आहे.
पहिल्या फेरीतील प्रवेश पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांची माहिती महाविद्यालयांकडून प्रसिद्ध केली जाणार असून त्यानंतर विद्यार्थ्यांना पसंतीक्रमात बदल करण्याची संधी मिळणार आहे.
चौकट……
अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी ५ जूननंतर जाहीर होणार असून त्यानंतर उर्वरित तीन फेऱ्यांच्या याद्याही टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १ जुलै किंवा १५ जुलैपासून अकरावीचे नियमित वर्ग सुरू करण्याचे नियोजन माध्यमिक शिक्षण विभागाने केले आहे.
Post Views: 8
Previous Post

डोक्यात दगड घालून मित्राच्या खून प्रकरणी तिघा आरोपी  मित्रांना एक जून पर्यंत पोलीस कोठडी 

Next Post

एमआयएमच्या गटनेत्या वहिदाबानो शेख यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची निवेदनाद्वारे मागणी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

एमआयएमच्या गटनेत्या वहिदाबानो शेख यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची निवेदनाद्वारे मागणी

ताज्या बातम्या

मॉडेल अकॅडमीची कुर्डूवाडीवर मात ; संस्कार गवळीचा अष्टपैलू खेळ,  ययाती आणि यशची अर्धशतके

मॉडेल अकॅडमीची कुर्डूवाडीवर मात ; संस्कार गवळीचा अष्टपैलू खेळ,  ययाती आणि यशची अर्धशतके

May 30, 2026
सुमन चंद्रशेखर यांना राज्यस्तरीय काव्यगौरव पुरस्कार जाहीर

सुमन चंद्रशेखर यांना राज्यस्तरीय काव्यगौरव पुरस्कार जाहीर

May 30, 2026

पालखी मार्ग रस्ते संदीकरणाची नितांत गरज

May 30, 2026

युनायटेड  व हाय परफॉर्मन्स क्लबची विजयी घोडदौड

May 30, 2026
कृषी सहायकाकडून शेतकऱ्यांना शिवीगाळ; ग्रामस्थांची वरिष्ठांकडे तक्रार 

कृषी सहायकाकडून शेतकऱ्यांना शिवीगाळ; ग्रामस्थांची वरिष्ठांकडे तक्रार 

May 30, 2026

सावित्रीबाई शासकीय वसतिगृह कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची मागणी

May 30, 2026
उन्हाच्या चटक्यांपासून भाविकांनादिलासा देणाऱ्या वरद व सृष्टी या भावा-बहिणीचा एक छोटासा प्रयत्न ! 

उन्हाच्या चटक्यांपासून भाविकांनादिलासा देणाऱ्या वरद व सृष्टी या भावा-बहिणीचा एक छोटासा प्रयत्न ! 

May 30, 2026

प्रवाश्याचा मोबाईल चोरीस; जीवे मारण्याची धमकी

May 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0886116

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697