सोलापूर : भीम प्रतिष्ठान, सोलापूर यांच्या वतीने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त शिवस्मारक, शिंदे चौक येथे मोफत शालेय साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रंगनाथ बंकापुरे, राजेंद्र शहा, संतोष गायकवाड आणि अश्विनी चव्हाण उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक, शैक्षणिक व लोककल्याणकारी कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.भीम प्रतिष्ठानचे संस्थापक दलितमित्र बाबा बाबरे, अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे, सचिव अकबर शेख व कार्याध्यक्ष सिद्धांत बाबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमराव माने, वैभव लोखंडे, प्रेम अंकुश, प्रदीप बाबरे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सिद्धांत बाबरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रेम अंकुश यांनी मानले. कार्यक्रमास नागरिक, पालक, विद्यार्थी व समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
Post Views: 10