कुर्डूवाडी – भोसरे येथे तुळजाई वेलफेअर फाऊंडेशनच्या वतीने मोफत डोळे तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले. सदर शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या सौ. अश्विनीताई दळवी यांच्या शुभ हस्ते व तालुका पंचायत सदस्य राजपूत सर यांच्या उपस्थितीत झाले.या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 150 पेक्षा अधिक नागरिकांनी मोफत डोळे तपासणीचा लाभ घेतला. शिबिरात मोतीबिंदू, दृष्टीदोष, काचबिंदू आदी तपासण्या करण्यात आल्या. गरजू रुग्णांना मोफत औषधे व चष्मे वाटप करण्यात आले .यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून निमगावचे आदर्श सरपंच यशवंत भैय्या शिंदे ,माजी जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव बागल, सरपंच प्रतिनिधी शिवाजी कुंभार, माजी तालुका पंचायत सदस्य सुरेश बागल, उपसरपंच सुधीर बागल, ग्रामपंचायत सदस्य लता बागल, शालन निरगुडे, रविराज बागल, नामदेव बागल सर, नासिर शेख,अमोल खोत, मकसूद बागवान, माजी उपसरपंच सुलनताई बागल, प्रमोद बागल, रुपेश बागल, मनोज बागल, शेख राहुल बागल, सतीश काळे, विशाल बागल आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Post Views: 7