मंगळवेढा – मंगळवेढा शहरातील खोमनाळ रोडजवळील प्रविण वाकडे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजण्यापूर्वी एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत दत्तात्रय नामदेव पाटोळे (वय ४२, रा. मेडशिंगी, ता. सांगोला, जि. सोलापूर; हल्ली रा. मुंबई) असे त्यांचे नाव आहे.
पोलीस तक्रारीनुसार, प्रकाश आवताडे (रा. दातपूर, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याने दत्तात्रय पाटोळे यांना पैसे देण्यासाठी लावलेल्या तगाद्यास व वारंवार दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळुन ही आत्महत्या केली. फिर्यादी दयानंद नामदेव पाटोळे (वय ३८, व्यवसाय मजुरी, रा. मेडशिंगी) यांनी दिलेल्या माहितीवरून मंगळवेढा पोलीस ठाण्यात BNS २०२३ च्या कलम १०८ अन्वये गुन्हा क्र. ८१६/२०२६ नोंदवण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मयताच्या कुटुंबीयांकडून विलंबाने माहिती मिळाल्याने नोंदणीत विलंब झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
Post Views: 9