६ फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन नगरपरिषद विहिरींमध्ये करू नये

सांगोला –   श्रीगणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने व्हावे यासाठी सांगोला नगरपरिषदेमार्फत शहरातील घरगुती व लहान गणपती मूर्तींच्या विसर्जनासाठी आठवडा बाजार आतील व बाहेरील विहीर, कुंभार गल्ली विहीर या तीन विहिरी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दरम्यान यावर्षी सांगोला शहरात पर्जन्यमान सरासरीपेक्षा खूपच कमी झाले असल्याने प्रशासनाने निश्चित केलेल्या तिन्ही विहिरींमध्ये पाण्याची पातळी अत्यंत कमी आहे. या विहिरींची एकूण क्षमता, सुरक्षितता, विसर्जनाच्या वेळी होणारी संभाव्य गर्दी आणि त्यातून निर्माण होणारे धोके विचारात घेता ६ फुटांपेक्षा जास्त उंचीच्या श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन नगरपरिषदेच्या विहिरींमध्ये करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ६ फुटांपेक्षा जास्त उंचीच्या श्रीगणेश मूर्तींची स्थापना करणार आहेत त्यांनी नगरपरिषदेच्या विहिरींमध्ये विसर्जन न करता आपल्या स्तरावरून इतर योग्य व सुरक्षित ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करावी. तसेच शहरातील ६ फुटांपेक्षा कमी उंचीच्या श्रीगणेश मूर्तींच्या विसर्जनाच्या वेळी सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखणे, वाहतूक व्यवस्थेला अडथळा न आणणे तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करावे. हा गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सांगोला नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
चौकट-
सांगोला शहर हे नेहमीच सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांत पुढे राहिले आहे. यंदाचा सण साजरा करताना आपण आपल्या निसर्गाचे रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. १ ऑगस्ट २०२५ च्या शासकीय आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी पीओपीच्या मूर्तींऐवजी केवळ शाडूची माती किंवा पर्यावरणपूरक साहित्यापासून बनवलेल्या मूर्तींचाच वापर करावा. तरी सर्व सांगोलावासीयांनी प्रशासनाला सहकार्य करून हे सण पूर्णपणे पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करावेत.
-डॉ.सुधीर गवळी, मुख्याधिकारी, न.प.सांगोला
Next Post

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!