सोलापूर – ७६वी सीनियर स्टेट बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा 13 ते १८ नोव्हेंबर या कालावधीत सातारा येथे होणार आहे. या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याचा महिला व पुरुष बास्केटबॉल संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धांसाठी सोलापूर जिल्हा संघाची निवड चाचणी गुरुवारी 29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:०० वाजता होम मैदान बास्केटबॉल क्रीडांगणावर आयोजित केली आहे. यात सहभागी होण्यासाठी इच्छुक खेळाडूंनी अधिक माहितीसाठी दिनेश सारंगी (मो.नं. ९३५९४४४८५६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सोलापूर शहर व जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव साकिब शेख यांनी कळविले आहे.
—–



















