Thursday, October 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अल निनोच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ व्यवस्थापन आराखडे तातडीने कार्यान्वित करा

तरुण भारतbyतरुण भारत
June 21, 2026
in marathwada
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जालना : यंदा अल निनोच्या प्रभावामुळे राज्यात कमी पर्जन्यमानाची शक्यता वर्तविण्यात येत असताना राज्य सरकारने अधिक विलंब न करता राज्य, जिल्हा, तालुका, मंडळ आणि ग्रामस्तरावरील दुष्काळ आपत्ती व्यवस्थापन आराखडे तातडीने तयार करून कार्यान्वित करावेत, तसेच होऊ घातलेल्या अधिवेशनात हा मुद्दा मांडून याविषयी उपाययोजना कराव्यात अशी आग्रही मागणी शिवसेना सचिव तथा महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉ. संजय लाखेपाटील यांनी केली आहे. डॉ. लाखेपाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन व ई-मेलद्वारे ही मागणी केली असून यासंदर्भात प्रत्यक्ष भेट घेऊनही त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.
भारतीय हवामान विभाग, स्कायमेट तसेच विविध आंतरराष्ट्रीय हवामान संशोधन संस्थांनी अल निनो सक्रिय झाल्याचे संकेत दिले असून यामुळे
चालू वर्षात 42 ते 62 % पाऊसमान कमी पडण्याचे शास्त्रीय अंदाज व्यक्त केले आहेत आणि जवळपास सगळा जून महिना कोरडा गेला पावसाचा मोठा खंड पडला आहे. मान्सूनचा वेग मंदावल्याने भविष्यात गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे डॉ. लाखेपाटील यांनी नमूद केले आहे. राज्य सरकारने प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दुष्काळ देखरेख समित्या तातडीने कार्यान्वित कराव्यात आणि दुष्काळ व्यवस्थापन मार्गदर्शिका-2020 नुसार कामकाज सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार केंद्र सरकारने लागू केलेल्या ‌‘मॅन्युअल फॉर ड्रॉट मॅनेजमेंट‌’ या वैधानिक प्रणालीचे पालन करणे राज्य सरकारसाठी बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुष्काळ निर्धारणासाठी पूव वापरली जाणारी ‌‘ट्रिगर‌’ प्रणाली प्रभावीपणे राबविली जात नसल्याचे दिसून येत असल्याचा दावा करत त्यांनी यामुळे वेळेवर दुष्काळ जाहीर करणे, केंद्राची मदत मिळविणे आणि पीकविमा दाव्यांचे योग्य निर्धारण करणे कठीण होत असल्याचे सांगितले. परिणामी शेतकऱ्यांना अपेक्षित मदत मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गेल्या काही वर्षांत अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान होत असल्याचा उल्लेख करत डॉ. लाखेपाटील यांनी ‌‘ग्रीन ड्रॉट‌’ अर्थात ‌‘हिरवा दुष्काळ‌’ या संकल्पनेचा विचार करण्याची गरज व्यक्त केली. कर्नाटक आणि गुजरातसारख्या राज्यांनी अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानासाठी स्वतंत्र निकष तयार केले आहेत. महाराष्ट्रातही अशा परिस्थितीसाठी स्पष्ट धोरण आणि निकष जाहीर करावेत, अशी मागणी त्यांनी केली. राज्यात मदत व पुनर्वसन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग हे दोन वेगवेगळ्या मंत्र्यांकडे असल्याने निर्णय प्रक्रियेत विलंब होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी दोन्ही विभाग एकाच मंत्र्यांकडे सोपविण्याची मागणी केली. यामुळे आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात अधिक सुसूत्रता आणि समन्वय निर्माण होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

——————-
चौकट…….
अधिवेशनात दुष्काळावर विशेष चर्चा व्हावी
राज्यात निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता  अधिवेशनात दुष्काळ, पर्जन्यमानातील तूट, शेतकरी मदत, पीकविमा आणि आपत्ती व्यवस्थापन यावर किमान तीन दिवस विशेष चर्चा घेण्यात यावी, अशी मागणीही डॉ. लाखेपाटील यांनी केली आहे. दुष्काळ आणि अतिवृष्टी या दोन्ही संकटांचा विचार करून राज्य सरकारने तातडीने दीर्घकालीन आणि प्रभावी नियोजन करावे, अन्यथा शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात, असेही डॉ. लाखे पाटील यांनी सांगीतले आहे.

Post Views: 60
Previous Post

धारदार कोयत्यासह तरुण ताब्यात, शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन; गुन्हा दाखल

Next Post

श्री जयसिंह मोहिते-पाटील विद्यालय, संग्रामनगर येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
श्री जयसिंह मोहिते-पाटील विद्यालय, संग्रामनगर येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्री जयसिंह मोहिते-पाटील विद्यालय, संग्रामनगर येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

बार्शी टाउन रेल्वे स्थानकावर स्पेशल एक्सप्रेसचे पुष्पवृष्टीने स्वागत

बार्शी टाउन रेल्वे स्थानकावर स्पेशल एक्सप्रेसचे पुष्पवृष्टीने स्वागत

October 14, 2026
तर याद राखा ! विभागीय आयुक्त शीतल तेली उगले संतापल्या

तर याद राखा ! विभागीय आयुक्त शीतल तेली उगले संतापल्या

October 14, 2026
सोलापुरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचा वाढता धोका 

सोलापुरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचा वाढता धोका 

October 14, 2026
मोटारसायकल चोरीचा १२ तासांत छडा; दोघांना अटक

मोटारसायकल चोरीचा १२ तासांत छडा; दोघांना अटक

October 14, 2026
लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींची तालुकास्तरीय मैदानी खेळ स्पर्धेत चमकदार कामगिरी

लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींची तालुकास्तरीय मैदानी खेळ स्पर्धेत चमकदार कामगिरी

October 14, 2026
महात्मा फुले मराठी साहित्य संमेलन २७ व २८ नोव्हेंबर रोजी खानवडीत

महात्मा फुले मराठी साहित्य संमेलन २७ व २८ नोव्हेंबर रोजी खानवडीत

October 14, 2026

आता पोषण आहारात भरडधान्यांचा ‘पोषक डोस’; पनीर-टोफूचाही समावेश!

October 14, 2026
बॅडमिंटन स्पर्धेत शिवाजी महाविद्यालय अजिंक्य सलग दुसऱ्या वर्षी यश

बॅडमिंटन स्पर्धेत शिवाजी महाविद्यालय अजिंक्य सलग दुसऱ्या वर्षी यश

October 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1360330

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!