अकलूज – श्री जयसिंह मोहिते-पाटील विद्यालय, संग्रामनगर येथे रविवार दि. २१रोजी जागतिक योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्य संवर्धनासाठी योगाचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मल्हारी घुले, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गणेश करडे उपस्थित होते.
यावेळी क्रीडा शिक्षक सुभाष चव्हाण यांनी मुक्त हालचाली, विविध योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम व ध्यान यांची प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत योगाभ्यास केला. यानंतर सहशिक्षक महेश शिंदे आणि संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी गीत सादर करून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक विश्वनाथ हलकुडे यांनी केले.
प्रसंगी मुख्याध्यापक मल्हारी घुले यांनी विद्यार्थ्यांनी नियमित योगाभ्यास करून निरोगी, सुदृढ व तणावरहित जीवन जगावे, असे आवाहन केले.
या उपक्रमात प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आज अकलूज परिसरात सर्व शाळांवरती योग दिन साजरा करण्यात आला शंकर नगर येथील महर्षी प्रशाला सदाशिवराव माने विद्यालय अकलूज शिवरत्न शिक्षण संस्था शंकर नगर याचबरोबर सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कामगार कल्याण मंडळातर्फेही योग दिनाच्या औचित्य साधून योग शिबिर घेण्यात आले
फोटो ओळी : जागतिक योग दिनानिमित्त श्री जयसिंह मोहिते-पाटील विद्यालय, संग्रामनगर येथे विद्यार्थी व शिक्षक सामूहिक योगासने, सूर्यनमस्कार आणि प्राणायाम करताना.
Post Views: 3