अक्कलकोट – सध्या महाराष्ट्रातील सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला आहे. या परिस्थितीत सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला बचत गटातील सदस्य तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
अशा कठीण परिस्थितीत महिला बचत गट, मायक्रो फायनान्स कंपन्या तसेच राष्ट्रीयीकृत बँकांकडून होणारी सक्तीची कर्जवसुली तात्काळ थांबवावी, अशी ठाम मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) अक्कलकोट तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी तहसिलदार विनायक मगर यांच्या कडे केली आहे.
दुष्काळामुळे नागरिकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला असून, अनेक कुटुंबांना दैनंदिन गरजा भागविणेही कठीण होत आहे. अशा वेळी कर्जवसुलीसाठी दबाव आणल्यास सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी आणखी वाढू शकतात. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन संबंधित बँका व मायक्रो फायनान्स कंपन्यांना आवश्यक निर्देश द्यावेत आणि कर्जदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात अक्कलकोटचे तहसीलदार श्री. विनायक मगर यांच्याकडे निवेदनाद्वारे सक्तीची कर्जवसुली तात्काळ थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे.यावेळी रिपाई जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी, तालुका उपाध्यक्ष आंबादास गायकवाड, तालुका उपाध्यक्ष प्रकाश गडगडे,दत्ता कांबळे,राजू कांबळे,ताहीर शेख,राजु हडपद, अर्जून बावकर, पुजा सनगुंदी,अजय कांबळे, निंगप्पा निंबाळ, शंकर बनसोडे आदी उपस्थित होते.
दुष्काळग्रस्त नागरिकांना आर्थिक संकटातून दिलासा मिळावा, महिलांवरील कर्जवसुलीचा ताण कमी व्हावा आणि प्रशासनाने जनहिताच्या दृष्टीने तातडीने योग्य पावले उचलावीत, अशी भूमिका अविनाश मडिखांबे यांनी मांडली आहे.
“दुष्काळाच्या संकटात सर्वसामान्य जनतेला दिलासा द्या; सक्तीच्या कर्जवसुलीला तात्काळ स्थगिती द्या!”अन्यथा रिपाइं कडून आंदोलन छेडण्याचा ईशारा या वेळी मडिखांबे यांनी केली आहे.
Post Views: 6