सांगोला – क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्पोर्ट्स कराटे असोसिएशन, सोलापूर यांच्या सहकार्याने आयोजित जिल्हास्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धा सन २०२६-२७ चे उद्घाटन आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड, तालुका संयोजक काशिलिंग शेळके, कराटेचे जिल्हाध्यक्ष जी.के.वाघमारे, ज्येष्ठ कराटे प्रशिक्षक सुनील वाघमारे उपस्थित होते. या स्पर्धा राष्ट्रीय पंचांच्या मार्गदर्शनाखाली होत असून निजेंद्र चौधरी, गणेश पवार, श्रावणी वाघमारे हे काम पाहत आहेत. कार्यक्रमाचे आभार जी.के.वाघमारे यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्याकरता क्रांतीश्वर बनकर, राहुल देडे, मयंक स्वामी, अजय वाघेला, लखन भगत परिश्रम घेत आहेत.