सोलापूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या पुणे विभागीय शालेय खो-खो स्पर्धेतील १४ वर्षांखालील मुलींच्या निवड चाचणीसाठी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, घोडातांडा येथील विद्यार्थिनी मालन पिंटू राठोड हिची निवड झाली आहे.
मालन राठोड हिने तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. तिच्या सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि क्रीडा कौशल्याच्या जोरावर तिची पुणे विभागीय निवड चाचणीसाठी निवड झाली आहे. या यशामुळे घोडातांडा शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
मालन राठोड हिला शाळेचे क्रीडा मार्गदर्शक . गणेश कुडले यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या निवडीबद्दल सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विशाल मुळे, दक्षिण सोलापूरच्या गटशिक्षणाधिकारी जयश्री सुतार, तालुका क्रीडा अधिकारी . राहुल गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी . गुरुबाळ सनके, विस्तार अधिकारी मल्लिनाथ स्वामी, हत्तुर केंद्राचे केंद्रप्रमुख . भरत अंगुले, समृद्धी स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष संजय सावंत, दक्षिण सोलापूर क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष . विरेश थळंगे, क्रीडा मार्गदर्शक गुरु अचलेरे, . संतोष कस्तुरे, सुखदेव गुरव तसेच शाळेचे मुख्याध्यापक संजयकुमार गायकवाड आणि शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका यांनी मालनचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Post Views: 12