Friday, June 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जांभूळ विक्रीला वेग; शहरवासीय व पर्यटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

तरुण भारतbyतरुण भारत
June 12, 2026
in solapur
0
जांभूळ विक्रीला वेग; शहरवासीय व पर्यटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट –   पावसाळ्याच्या चाहुलीसोबत पर्यटनस्थळांच्या परिसरात, महामार्गावर जांभळांची विक्री जोमाने सुरू झाली आहै  शहरवासीयांसह पर्यटकांकडून या हंगामी फळाला मोठी पसंती मिळत आहे. रस्त्यांच्या कडेला, पर्यटनस्थळांच्या प्रवेशद्वारांवर तसेच स्थानिक बाजारांमध्ये जांभूळ विक्रेत्यांची लगबग वाढली आहे.
नैसर्गिक चव, आकर्षक रंग आणि आरोग्यवर्धक गुणधर्मांमुळे जांभूळ हे फळ ग्राहकांच्या पसंतीचे ठरत आहे. विशेषतः मधुमेह नियंत्रणासाठी उपयुक्त मानल्या जाणाऱ्या जांभळाच्या बिया व फळांबाबत ग्राहकांमध्ये जागरूकता वाढल्याने मागणीही वाढली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व वनक्षेत्रातून जांभूळ गोळा करणाऱ्या कुटुंबांना चांगला रोजगार मिळत आहे.
सुट्टीच्या दिवसांत पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असल्याने जांभूळ विक्रीत आणखी भर पडत आहे. पर्यटक जांभळांचा आस्वाद घेण्याबरोबरच घरी नेण्यासाठीही मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. अवकाळी व मान्सूनच्या पावसाने हजेरी लावल्याने यंदाच्या वर्षी दर्जेदार आणि रसाळ जांभूळ उपलब्ध झाल्याने विक्रीत समाधानकारक वाढ झाली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
जांभूळ काढण्यासाठी विक्रेत्यांना मोठी मेहनत घ्यावी लागते. उंच झाडांवर चढून काळजीपूर्वक फळे गोळा करावी लागतात. तरीही ग्राहकांकडून मिळणारा प्रतिसाद आणि वाढती मागणी यामुळे विक्रेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
हंगामी फळांमध्ये जांभूळ हे आरोग्यदायी आणि नैसर्गिक पर्याय म्हणून ओळखले जात असल्याने आगामी काही आठवडे बाजारपेठेत जांभूळ विक्रीचा हंगाम अधिक रंगतदार होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सध्या आठवडा बाजारसह भाजी मंडईत शेतकरी आणि व्यापारी वर्ग जांभूळ विक्री करीत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
कोट–
जांभळाची गोड-तुरट चव आणि आरोग्यदायी गुणधर्म यामुळे शहरवासीयांसह पर्यटकांकडून मोठी मागणी आहे. स्थानिक विक्रेत्यांसाठी हा हंगाम आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरत आहे.
तसेच निसर्गाने दिलेल्या जांभळाच्या प्रत्येक दाण्यात चव, आरोग्य आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारी संधी दडलेली आहे. सालाबादप्रमाणे यंदाही जांभूळ विक्री जोमाने सुरू असून त्याचा दर प्रति किलोला २५० ते १५० रुपये इतका आहे.
– अथर्व म्हेत्रे
शेतकरी
अक्कलकोट ते सोलापूर महामार्ग.
Post Views: 10
Previous Post

पाच मजली वातानुकुलित महाप्रसादगृहाच्या निर्मीतीचा संकल्प

Next Post

लवकरच जनता दरबार सुरु करणार-आ.डाॅ.बाबासाहेब देशमुख

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

लवकरच जनता दरबार सुरु करणार-आ.डाॅ.बाबासाहेब देशमुख

ताज्या बातम्या

लोकनाथ मीडिया चषक स्पर्धेचे शानदार उद्घाटन

लोकनाथ मीडिया चषक स्पर्धेचे शानदार उद्घाटन

June 12, 2026

शेअर बाजारातील १ कोटी ८१ लाखांच्या नुकसानीतून उद्ध्वस्त झाला हसता-खेळता संसार!

June 12, 2026

शिव्या दिल्याचा जाब विचारल्याने तरुणास लोखंडी रॉड व लाथा बुक्याने मारहाण

June 12, 2026

शेतातील कचऱ्यापासून तयार नवीकरणीय डिझेलचा वाहनात यशस्वी प्रयोग

June 12, 2026

बुरलेवाडी येथील मजुराच्या मुलाची जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्ण झेप

June 12, 2026

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे 94 कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद

June 12, 2026

रोजगार, बेरोजगारी व असंघटित क्षेत्राची माहिती संकलित होणार

June 12, 2026

अवैध वाळू उत्खननाविरोधात प्रशासन आक्रमक; जिल्हाधिकारी आशिमा मित्तल व एसपी संधू यांची अचानक पाहणी

June 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0906228

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697