श्रीपूर – येथिल कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या परंपरेप्रमाणे दिपावली सणासाठी गळीत हंगाम २०२५ / २६ मध्ये गाळप केलेल्या ऊसास प्रति मे.टन ५० रु .प्रमाणे ऊस बिल ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहे.त्यामुळे कारखान्याकडे गाळपास आलेला ऊसास प्रति मे.टन रक्कम रु. ३०५० रु . दर झाला आहे. कारखान्याच्या परंपरेप्रमाणे दिपावली सणासाठी ऊस उत्पादकांना ऊस बिल दिले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी दिली. यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन कैलास खुळे, संचालक व कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी उपस्थित होते. अधिक माहीती देतान प्रशांतराव परिचारक म्हणाले की ,कारखाना स्थापनेपासून ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना दिपावली सणासाठी पैशाची गरज असल्याने त्यांना ऊस बिल देणेची परंपरा कारखान्याच्या व्यावस्थापणाने जपली असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यांने गळीत हंगाम २०२५ / २६ मध्ये गाळप झालेल्या ऊसास आज प्रती मे.टन रक्कम रु.५० रु . प्रमाणे पाच कोटी बँकेत वर्ग केले आहेत . कारखान्याने ऊस उत्पादकांना एफ. आर. पी. पेक्षा ज्यादा रक्कम अदा केली आहे. तर चालू गळीत हंगामा मध्ये कारखान्याकडे सुमारे ९ लाख हेक्टर ऊस क्षेत्राच्या नोंदी असून सर्व ऊसाचे वेळेत गाळप वेळेत करण्याचा कारखाना व्यावस्थापनाचा मानस आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक दिनकरराव मोरे, उमेशराव परिचारक, दिलीपराव चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासाहेब यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे ,भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, सुदाम मोरे, विजय जाधव, हनुमंत कदम, किसन सरवदे, दाजी पाटील, दिलीप गुरव, शामराव साळुंखे, राणू पाटील व कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.
Post Views: 12