सोलापूर : श्री मार्कंडेय ज्येष्ठ नागरिक संघाची पाक्षिक सभा व ऑक्टोबर महिन्यातील सदस्यांचा सामूहिक वाढदिवस सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. मार्कंडेय जलतरण तलावाजवळील एमपीएससी अभ्यासिका हॉलमध्ये अर्थक्रांती जीवन गौरव अभियानाच्या पुणे प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष गुरुलिंग कन्नूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.
यावेळी कन्नूरकर यांनी संघाच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन ज्येष्ठ नागरिकांनी एकजुटीने संघाच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
कोईमतूर येथे झालेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत वयाच्या ७५व्या वर्षी उल्लेखनीय कामगिरी करून दोन कांस्यपदके व एक उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविणारे ज्येष्ठ जलतरणपटू अरविंद बुगडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
तसेच ऑक्टोबर महिन्यात वाढदिवस असलेले संघाचे सदस्य नागेश काकी, अविनाश पतकी, सौ. सविता सामलेटी, अशोक सामलेटी व सुभाष बिरादार यांचा स्नेहपूर्ण मोत्याचा हार,पुष्पगुच्छ व सन्मान पत्र देवून
सत्कार करून सामूहिक वाढदिवस साजरा करण्यात आला. हा सन्मान घनश्याम दायमा, यशवंत बंकापुर, मन्मथ कोनापुरे, किशोर बेद व सतिश नन्ना यांच्या हस्ते करण्यात आला.
सत्कारमूर्तींच्या वतीने अविनाश पतकी यांनी संघाच्या कार्याची प्रशंसा करून भविष्यात संघाच्या कार्यात सर्वांनी एकजुटीने योगदान देण्याचा विश्वास व्यक्त केला. सुभाष बिरादार यांच्या सहकार्याने आयोजित अल्पोपहाराचा उपस्थितांनी आस्वाद घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संघाचे समन्वयक श्री. किशोर बेद यांनी विशेष परिश्रम घेतले.
संघाचे अध्यक्ष यशवंत बंकापुर यांनी उपस्थितांचे आभार मानले. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सभा व विविध उपक्रम आयोजित करण्यासाठी एमपीएससी अभ्यासिका हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार प्रणिती शिंदे यांचे आभार व्यक्त करण्यात
Post Views: 14