सोलापूर – मजरेवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री शिवानंद भिमणवरू हे ३१ मे २०२६ला सेवानिवृत्त होत असल्याने कुमठे केंद्राच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला .
अतिशय शांत , सुस्वभावी तसेच विद्यार्थी प्रिय असलेले श्री भिमणवरु सर मजरेवाडी शाळेत आल्यापासून शाळेचे रुपडेच बदललेले आहे . शाळेत जवळजवळ पन्नास लाखापर्यंतचे शैक्षणिक उठावाअंतर्गत भौतिक सुविधा त्यांच्या काळात झालेले आहे . त्यामध्ये १ते ७ वर्गास स्मार्ट टिव्ही , शाळेच्या नावाचा बोर्ड , सांस्कृतिक कार्यक्रमासाठी कट्टा , स्वतंत्र बालवाडी वर्गखोली , शाळेला संरक्षक कुंपण प्रत्येक वर्गात बोलक्या भिंती अश्या अनेक सुविधा झालेल्या आहेत याशिवाय शाळेने अनेक स्पर्धोमध्ये सहभाग घेऊन नावलौकिक मिळविला आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पधें मध्ये तालुक्यात द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळवले , शिष्यवृत्ती , ATS स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा शाळेने त्यांच्या काळात यश संपादन केले . अश्या सर्वगुण संपन्न, सह्रदयी व तितकेच नम्र असलेल्या मुख्याध्यापकांना निरोप देताना विदयार्थ्यांबरोबर शिक्षकांचे सुद्धा डोळे पाणावले होते .
या निरोप समारंभाप्रसंगी तालुका विस्ताराधिकारी श्री बापूसाहेब जमादार , केंद्रप्रमुख श्री सिद्राम वाघमोडे साहेब , माजी शिक्षण विस्ताराधिकारी तथा शिक्षक नेते श्री अंकुश काळे सर , शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री विरभद्र यादवाड सर, शिक्षक महासंघाचे नेते श्री म ज मोरे सर शा व्य स अध्यक्ष श्री भैरप्पा कुरे जिल्हा मागासवर्गीय संघाचे अध्यक्ष श्री शशीकांत खुडे सर तसेच केंद्रातील बहुसंख्य शिक्षक वर्ग उपस्थित होते .

























