सांगोला – अखंड भारताच्या उभारणीत ऐतिहासिक भूमिका बजावणारे भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन फॅबटेक पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य तानाजी बुरूंगले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रा.स्वप्नील बंडगर यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि देशाच्या एकात्मतेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाविषयी मनोगत व्यक्त केले. प्रतिकूल परिस्थितीतही देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी केलेले कार्य आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सागितले. या कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 12