सोलापूर : सोलापूरचे महापौर श्री. विनायक दादा कोंड्याल व धनश्रीताई कोंड्याल यांनी आज तुळजापूर येथील महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन विधिवत पूजन केले. त्यानंतर मार्डी येथील श्री यमाई देवीचे दर्शन घेतले. तसेच सोलापूर शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री रूपाभवानी मातेच्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले व आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी महापौरांच्या मातोश्री संगीता कोंड्याल उपस्थित होत्या.
तुळजापूर येथे आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर महापौर विनायक कोंड्याल व धनश्रीताई कोंड्याल यांनी मार्डी येथील श्री यमाई देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवी मातेच्या चरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.
यानंतर सोलापूर शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि आराध्य दैवत असलेल्या श्री रूपाभवानी मातेचे दर्शन घेऊन विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक शहाजी भाऊ पवार, नगरसेवक सात्विक बडवे तसेच श्री रूपाभवानी देवस्थानचे मसरे उपस्थित होते.
सोलापूर शहराला धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा समृद्ध वारसा लाभला आहे. तुळजाभवानी माता, यमाई देवी आणि श्री रूपाभवानी मातेच्या दर्शनाच्या निमित्ताने महापौर विनायक कोंड्याल व धनश्रीताई कोंड्याल यांनी भक्तिभाव व्यक्त केला. यावेळी सोलापूर शहराचा विकास अधिक वेगाने व्हावा, नागरिकांना उत्तम सुविधा मिळाव्यात आणि शहरात सुख, शांती व समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना देवी मातेच्या चरणी करण्यात आली.
या धार्मिक दर्शनामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. महापौर विनायक कोंड्याल, धनश्रीताई कोंड्याल आणि मातोश्री संगीता काकू कोंड्याल, पार्वती आत्या चिलवेरी यांनी तिन्ही देवींचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले. तसेच श्री रूपाभवानी देवस्थानचे मसरे आणि उपस्थित मान्यवर यावेळी सहभागी झाले होते.
Post Views: 6