अक्कलकोट – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, अक्कलकोट येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ‘एक सही संतापाची’ हे अभियान राबविण्यात आले. अक्कलकोट बसस्थानकासमोर आयोजित या अभियानात मतदार आणि नागरिकांकडून सह्या घेऊन निवडणूक प्रक्रियेबाबतच्या मागण्यांना पाठिंबा नोंदविण्यात आला.
मनसे नेते दिलीप धोत्रे, जिल्हा संपर्क अध्यक्ष ॲड. किशोर शिंदे, ॲड. सुधीर पाटसकर, जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर आणि लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
**निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करण्याची मागणी**
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, मतदानासाठी बॅलेट पेपरचा वापर करण्यात यावा, एसआयआर (SIR) मतदार यादी प्रक्रिया रद्द करून नव्याने यादी तयार करावी, स्वच्छ व पारदर्शक मतदार यादी तयार करावी, तसेच निवडणूक आणि मतदान प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडावी, अशा विविध मागण्या या अभियानाच्या माध्यमातून करण्यात आल्या.
या वेळी मतदार आणि नागरिकांनी अभियानात सहभागी होत सह्या नोंदविल्या. लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ व्हावा आणि निवडणूक व्यवस्थेत पारदर्शकता यावी, हा या अभियानामागील उद्देश असल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात आले.
**मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग**
या अभियानावेळी मनसे तालुकाध्यक्ष मल्लिनाथ पाटील, शहर उपाध्यक्ष शामराव पाटील, तालुका उपाध्यक्ष मल्लिनाथ महादेव पाटील, गटाध्यक्ष काशिनाथ मरतुरे, गटाध्यक्ष काशिनाथ मणुरे, दुधनी शाखाध्यक्ष मनोज राठोड, बोरी उमरगे शाखाध्यक्ष काशिनाथ पाटील आणि हसापूर शाखाध्यक्ष रोहित चव्हाण यांच्यासह मनसेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही या अभियानात सहभाग नोंदविला.
Post Views: 11